Small Business Idea : 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्यासाठी दोन लाखांची कमाई होणार, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना नोकर कपातीचा फटका बसला आहे. कोरोना काळापासून नोकरकपात वाढली आहे. गुगल फेसबुक अमेझॉन यांसारख्या अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

यामुळे सध्या खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. हेच कारण आहे की आता तरुणाईचा माईंड सेट पूर्णपणे बदलला आहे. आता तरुण वर्ग नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य देऊ लागला आहे. अनेकांनी नोकरी सोडून व्यवसायाची वाट धरली आहे.

यामुळे जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण एका बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत. आज आपण गोल्ड फिश फार्मिंग बिझनेस बाबत जाणून घेणार आहोत.

या व्यवसायाची विशेषता म्हणजे हा व्यवसाय कोणीही करू शकतो. या व्यवसायाला कमी जागा लागते. खरतर, गोल्ड फिशला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. हे गुड लक म्हणून अनेकजन घरात ठेवतात. काहीजण शो पीस म्हणून हे आपल्या घरातील हॉल मध्ये ठेवतात. यामुळे गोल्ड फिश बाजारात कायमंच चढ्या किमतीत विकले जाते.

किती गुंतवणूक करावी लागेल

गोल्डफिश फार्मिंग बिझनेस करण्यासाठी सुरुवातीला थोडी गुंतवणूक करावी लागेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लाख रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. जर तुमच्याकडे एवढी गुंतवणूक असेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

किंवा तुम्ही या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला शंभर वर्गफूट एक्वेरियमची गरज भासणार आहे. एक्वेरियम खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये पर्यंत खर्च करावा लागेल. आणि इतर खर्चासाठी आणखी 50 हजार रुपयांची गरज भासेल. जर हा व्यवसाय थोडा मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर एकूण खर्च दोन ते अडीच लाखांपर्यंत जाऊ शकतो.

गोल्ड फिश मत्स्यपालन करण्यासाठी सीड म्हणजे बियाणे देखील लागणार आहे. बियाणे खरेदी करण्यापूर्वी, आपण हे जाणून घेतले पाहिजे की नर आणि मादीचे गुणोत्तर 4:1 असायला पाहिजे.

बियाण म्हणजे मत्स्यबीज टाकल्यानंतर ४ ते ६ महिन्यांनी मासे विक्रीसाठी तयार होतात. म्हणजे या व्यवसायामधून सहा महिन्यानंतर कमाई होऊ शकते. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता.

Leave a Comment