शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! मोहरीचे नवीन वाण विकसित, काय आहेत नवीन वाणाच्या विशेषता ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mustard New Variety : मोहरी हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. भुईमूग नंतर मोहरी या तेलबिया पिकाची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्रात देखील मोहरी लागवडीखालील क्षेत्र उल्लेखनीय आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मोहरीची लागवड पाहायला मिळते.

भंडारा आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात मोहरीचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. येथे खरीप हंगामात भाताची आणि रब्बी हंगामात मोहरीची लागवड पाहायला मिळते. मोहरी हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक असून रब्बी हंगामात मोहरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे.

ते म्हणजे मोहरीच्या एका नवीन जातीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे मोहरी उत्पादक शेतकऱ्यांना या नव्याने विकसित झालेल्या वाणाची पेरणी करून अधिकचे उत्पादन मिळवता येणार आहे.

नव्याने विकसित झालेले वाण कोणते

चौधरी चरण सिंग कृषी विद्यालय हरियाणा येथील शास्त्रज्ञांनी मोहरीचे नवीन वाण विकसित केले आहे. या नवीन वाणाला RH-1975 असे नाव देण्यात आले आहे. या वाणाची बागायती भागात वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

हा वाण इतर जातींपेक्षा अधिक उत्पादनक्षम आहे. इतर जातींपेक्षा या जातीपासून 12 टक्क्यांपर्यंतचे अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते असा दावा केला जात आहे. शास्त्रज्ञांनी मोहरीचा हा नवीन वाण तब्बल दहा वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर तयार केला आहे.

दरम्यान या नव्याने विकसित झालेल्या जातीचे बियाणे पुढल्या वर्षापासून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. या जातीपासून प्रति एकर 14 ते 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. या नवीन वाणामध्ये तेलाचे प्रमाण 40% एवढे आहे. यामुळे मोहरीचा हा नवीन वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो असा दावा केला जात आहे.

Leave a Comment