आताची सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार देशातील ‘ही’ मोठी बँक विकणार, ग्राहकांमध्ये भीती; तुमचे तर खाते नाही ना ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Modi Government Banking News : गेल्या महिनाभराचा काळ बारकाईने पाहिला असता रिझर्व बॅंक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने आपल्या रूल्स आणि रेगुलेशनचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 19 बँक आणि एनबीएफसी वर कडक दंडात्मक कार्यवाही केली आहे.

काही बँकांचा परवाना देखील गेल्या काही दिवसांच्या काळात रद्द करण्यात आला आहे. आरबीआयकडून उचलले जाणारे हे ठोस पावले, आरबीआयच्या नियमांचा भाग आहे. आरबीआयचे देशातील सर्व बँकांवर नियंत्रण असते. देशातील सर्वच बँकांना आरबीआयचे नियम लागू होतात.

अशा परिस्थितीत ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करतात अशा बँकांवर कारवाई करण्याचे अधिकार आरबीआयला देण्यात आले आहेत. मात्र RBI ने गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले कठोर निर्णय सर्वसामान्य नागरिकांना धडकी भरावत आहेत. आपली बहु कष्टाची जमापुंजी बँकेत असल्याने आरबीआयची ही दंडात्मक कार्यवाही आणि परवाना रद्द करण्याची कारवाई नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था तयार करत आहे.

अशातच आता केंद्रशासन एक मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ते म्हणजे देशातील एक मोठी बँक केंद्र शासन विकणार आहे. यामुळे सदर बँकेतील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. केंद्र शासनाने बँक विकल्यानंतर त्यांच्यावर काय परिणाम हा मोठा सवाल सदर बॅंकेच्या खातेधारकांमध्ये उपस्थित होत आहे.

कोणती बँक विकणार ?

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार आयडीबीआय ही बँक विकण्याच्या तयारीत आहे. सध्या केंद्र सरकारकडे आयडीबीआय बँकेचा ४५.४८ एवढा वाटा आहे. तर एलआयसीकडे या बँकेचा ४९.२४ टक्के एवढा वाटा आहे. म्हणजे केंद्र सरकारकडे आणि एलआयसीकडे आयडीबीआय बँकेतील ६०.७ टक्के वाटा आहे. दरम्यान केंद्र शासन आणि एलआयसी आपला हा हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत.

यामुळे आयडीबीआय बँकेतील ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की येत्या काही महिन्यात याबाबतचा निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा सरकार विकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्तसमोर आले आहे. याबाबत आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून तात्काळ पावले उचलले जातील असे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितले जात आहे.

दरम्यान IDBI बँक ताब्यात घेण्यासाठी कोटक महिंद्र बँक, सीएसबी बँक आणि एमिरॅट्स एनबीडी यांनी अर्ज केले असल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान, या बँकेतील सरकारचे शेअर विक्रीला रिझर्व बँकेने संमती दिली की या विक्री प्रक्रियेला वेग येणार असे काही जाणकार लोक सांगत आहेत. यामुळे आता आयडीबीआय बँक विक्री बाबत पुढे काय घटनाक्रम घडतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. 

Leave a Comment