Soyabean Market Maharashtra : सध्या बाजारात खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाची आवक सुरु झाली आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामाच्या पिक पेरणीकडे वळले आहेत. यामुळे त्यांना पैशांची निकड भासत आहे. सोबतच दिवाळीचा मोठा सण देखील उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अवघ्या तीन दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे.
याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात पैशांची गरज भासत आहे. रब्बी हंगामासाठी आणि सणासुदीला पैशाची गरज भासत असल्याने शेतकरी बांधव हार्वेस्टिंग झाल्या-झाल्या सोयाबीन आणि कापसाची विक्री करू लागले आहेत. मात्र सध्या खरिपातील या दोन्ही पिकांना अपेक्षित असा दर मिळत नाही.
शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव संकटात आले आहेत. खरंतर यंदा कमी पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन कमी राहणार आहे. उत्पादनात घट येणार हे जवळपास नक्की असल्याने शेतकऱ्यांना शेतमालाला चांगला दर मिळेल असे वाटत होते. परंतु सध्या स्थितीला सोयाबीन आणि कापूस हमीभावाच्या आसपासच विक्री होत आहेत.
यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान काल अर्थातच पाच नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात सोयाबीन हमीभावाच्या आसपासच विक्री झाले आहे. यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत.
राज्यात कालच्या लिलावात सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनला किमान 6000 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळण्याची आशा आहे. तूर्तास मात्र पिवळं सोनं काळवंडल आहे. यामुळे भविष्यात आता सोयाबीनला काय भाव म्हणतो यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सध्या बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती : कालच्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4700, कमाल 4851 आणि सरासरी 4800 एवढा भाव मिळाला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती : कालच्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 3000, कमाल 4700 आणि सरासरी चार हजार तीनशे एवढा भाव मिळाला होता.
वरोरा खंबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल सोयाबीनला किमान 3000, कमाल 4650 आणि सरासरी चार हजार तीनशे एवढा भाव नमूद करण्यात आला.
औसा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल सोयाबीनची सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनची 13472 क्विंटल आवक झाली होती. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4401, कमाल 4885 आणि सरासरी 4792 एवढा भाव मिळाला.
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल सोयाबीन किमान 3800, कमाल 4850 आणि सरासरी 4,200 या बाजारभावात विकला गेला आहे.