Soyabean Market Price : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सोयाबीनचा बाजारभावात आता हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. खरंतर सोयाबीन ( Soyabean Market Price ) हे एक प्रमुख कॅश क्रॉप Cash Crop आहे.
या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र लागवड केली जाते. परंतु मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात सोयाबीनची लागवड सर्वाधिक पाहायला मिळते. येथील बहुतांशी शेतकरी सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहेत.
गेल्या वर्षापासून मात्र हे पिवळं सोनं शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण म्हणजे गेल्या हंगामात सोयाबीनला ( Soyabean Price Maharashtra ) अपेक्षित असा भाव मिळालेला नाही. गेल्या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात हे पिवळ सोनं सहा हजार रुपये ते 7000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकले जात होते.
मात्र जसा-जसा हंगाम पुढे गेला तसे-तसे बाजारभाव कमी होत गेलेत. सध्या बाजारात नवीन हंगामातील सोयाबीनची आवक होत आहे. यावर्षी मानसून काळात कमी पाऊस बरसला असल्याने सोयाबीनचे उत्पादन खूप कमी झाले आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात अपेक्षित असा पाऊस बरसला नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात कपात होणार असा अंदाज आहे.
यामुळे दरात तेजी राहणार असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारभाव दबावात आले आहेत. गेल्या आठवड्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला होता. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दरात सातत्याने थोडी-थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे.
काल देखील बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली आहे. काल म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल सोयाबीनला कमाल 6700, किमान 6500 आणि सरासरी 6650 रुपये एवढा भाव मिळाला आहे.
म्हणजेच या बाजारात सोयाबीन बाजारभाव जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. पण राज्यातील बहुतांशी बाजारात अजूनही सोयाबीन 5,000 पर्यंत पोहोचलेला नाही. काल नागपूर व्यतिरिक्त फक्त मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर 5 हजार प्लस होते.
मेहकर एपीएमसीमध्ये काल सोयाबीनला किमान साडेचार हजार रुपये, कमाल पाच हजार 205 रुपये आणि सरासरी 4,850 रुपये एवढा भाव मिळाला आहे.
एकंदरीत, सोयाबीन बाजारभावात हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव अजूनही बाजारात पाहायला मिळत नाही. शेतकऱ्यांची यापेक्षा अधिक भाव मिळावा अशी इच्छा आहे.