Soyabean Rate Maharashtra : पिवळं सोन अर्थातच सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक आहे. या पिकाची शेती राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर एकूण उत्पादनापैकी सुमारे 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्र राज्यात घेतले जाते. तर 45 टक्के उत्पादन मध्यप्रदेश मध्ये घेतले जाते. म्हणजेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सोयाबीनचे 85 टक्के उत्पादन निघते.
एकंदरीत या दोन्ही राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावरच अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. मात्र हे पीक अलीकडे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचे ठरू लागले आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे कांदा प्रमाणे सोयाबीनच्या बाजारभावात देखील आता मोठ्या प्रमाणात लहरीपणा पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी पिवळं सोनं बाजारात तेजीत होते. पण गेल्यावर्षीपासून सोयाबीनचे बाजार भाव मंदीत आले आहे.
या चालू हंगामात देखील नवीन सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. बाजारात आता हळूहळू नवीन मालाची आवक होऊ लागली आहे. परंतु बाजारभाव अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाहीयेत.
पण काल अर्थातच 3 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल पार गेले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे मात्र यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल सोयाबीनला किमान 4500, कमाल 5235 आणि सरासरी चार हजार 835 एवढा भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4,350, कमाल 5011 आणि सरासरी 4846 प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल सोयाबीनला किमान चार हजार तीनशे, कमाल 5015 आणि सरासरी 4657 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल सोयाबीनला कमाल 5171, किमान चार हजार दोनशे आणि सरासरी 4685 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल सोयाबीनला 4200 किमान, 5030 कमाल आणि 4500 असा सरासरी भाव मिळाला आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कालच सोयाबीनला 4870 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 5130 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 5 हजार 60 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.