Soyabean Rate : सोयाबीन आणि कापूस हे खरीप हंगामात घेतले जाणारे मुख्य नगदी पीक आहेत. यंदा मात्र या दोन्ही पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. अतिवृष्टीमुळे कापसाचे आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
खरीप हंगामात हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे सोयाबीन पिकावर तर येलो मोझॅक या रोगाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. यामुळे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी राहणार आहे.
शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा त्यांना या पिकातून जास्तीत जास्त तीन ते चार क्विंटल एवढे उत्पादन मिळाले आहे. काही शेतकऱ्यांनी तर फक्त दोन ते तीन क्विंटल एवढाचं उतारा मिळाला असल्याचे सांगितले आहे.
साहजिकच जर मालाला चांगला भाव मिळाला तरच हे पीक शेतकऱ्यांना परवडणार आहे नाहीतर यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव स्थिर होते.
मालाला 5000 पेक्षा अधिकचा भाव मिळत होता. गेल्या आठवड्याचा विचार केला असता बाजारभाव 5300 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले होते. बाजारभावात गेल्या आठवड्यात थोडीशी सुधारणा झाली होती.
यामुळे आगामी काळ पिवळा सोन्याचा राहील आणि बाजारभावात वाढ होईल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागली होती. मात्र या आठवड्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी फारच निराशा जनक राहिली आहे.
कारण की, सोयाबीनच्या बाजारभावात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. काल अर्थात सोमवारी दर दोनशे रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून असेच परिस्थिती कायम राहिले तर शेतकऱ्यांना कस काय अच्छे दिन येणार हा मोठा सवाल आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या आठवड्यात यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव नमूद करण्यात आला होता. मात्र काल यामध्ये दोनशे रुपयांचे घसरण झाले आहे.
कालच्या लिलावात या बाजारात 4600 ते 4900 प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे. आता पुढील काळात पिकाला कसा भाव म्हणतो यावरच शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून राहणार आहे.