सोयाबीन उगवण झाल्यानंतर कोणते तणनाशक फवारावे ? काय सांगतात कृषी तज्ञ, वाचा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतशिवारात शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. पेरणीच्या कामासाठी बळीराजाची लगबग वाढली आहे. तसेच कृषी निविष्ठांच्या दुकानात बियाण्याची, खतांची आणि तणनाशकाची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळतं आहे.

खरंतर, चांगल्या दर्जेदार बियाण्याची पेरणी करणे हे जेवढे पीक उत्पादनासाठी आवश्यक आहे तेवढेच पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे देखील आवश्यक आहे. सोयाबीन पिकासाठी देखील पीक व्यवस्थापन आवश्यक बाब आहे. पीक व्यवस्थापनात तण नियंत्रण हा घटक महत्त्वाचा ठरतो. तण नियंत्रणासाठी योग्य तणनाशकाची फवारणी करणे जरुरीची राहते.

अनेकदा असे आढळून आले आहे की शेतकरी सोयाबीन पिकात उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी उगवण झाल्यानंतर करतात आणि उगवणपूर्व उगवण झाल्यानंतर जे तणनाशक वापरले जाते त्याची फवारणी करतात. यामुळे तणनियंत्रण योग्य पद्धतीने होत नाही. पिकात तण वाढते. मग अशावेळी शेतकऱ्यांना निंदणी किंवा खुरपणी करावी लागते.

यामुळे तणनाशकासाठी केलेला हजारोंचा खर्च आणि निंदणी किंवा खुरपणीसाठी लागणारी मजुरी यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करताना उगवण पूर्व कोणते तणनाशक वापरले पाहिजे आणि उगवण झाल्यानंतर कोणते तणनाशक वापरले पाहिजे याची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे.

दरम्यान आज आपण उगवण झाल्यानंतर कोणते तननाशक वापरले पाहिजे आणि पेरणीनंतर साधारणता किती दिवसांनी हे तननाशक फवारले पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

उगवणनंतर कोणते तन नाशक वापरावे?

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन पिकात तण तीन ते चार पानाचे झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी केली पाहिजे. साधारणता पेरणीनंतर 15 ते 20 दिवसात या तणनाशकाची फवारणी केली जाते.

यात पेरणी करून पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर अजिल (आदामा) हे तणनाशक वापरले जाऊ शकते. यात प्रोपॅक्वीझ्याफोप 10% EC हा घटक असतो. याचे प्रमाण 300 मिली प्रति एकर असे ठेवले पाहिजे. 

किंवा सिजेंटा कंपनीचे फूजीफ्लेक्स हे तणनाशक पेरणीनंतर 15 ते 20 दिवसात वापरले जाऊ शकते. यात फ्लूझीफोप पी बूटील हे घटक असतात. याचे प्रमाण एकरी 400 मिली एवढे ठेवले पाहिजे. 

किंवा मग पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी बी ए एस एफ कंपनीचे ओडिसी हे फवारले जाऊ शकते. हे तणनाशक 40 ग्राम प्रति एकर या प्रमाणात वापरले जाऊ शकते.

याव्यतिरिक्त, आदामा कंपनीचे शाकेड आणि बी ए एस एफ कंपनीचे परसूट हे तणनाशक देखील शेतकरी बांधव पीक पेरणी झाल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांनी फवारणी करू शकतात.

Leave a Comment