Soybean Market Maharashtra : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तब्बल एका वर्षानंतर गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे आता बाजारभावात पुन्हा एकदा सुधारणा होऊ लागली आहे. वास्तविक, सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. शाश्वत उत्पादन आणि दराची हमी या कारणांमुळे या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे.
राज्यात खरीप हंगामामध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देशातील एकूण Soyabean उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा जवळपास 40 टक्के एवढा वाटा आहे. देशातील Soyabean उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
अर्थातच राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या हंगामापासून शेतकऱ्यांसाठी हे पीक डोईजड ठरू लागले आहे. एकतर या पिकाची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.
वातावरणातील बदलामुळे पिकावर पिवळा मोजॅक या रोगाचा गेल्या काय वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट आली आहे.
यावर्षी देखील मान्सून काळात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिक उत्पादनात घट येणार आहे. एकीकडे उत्पादनात घट येत आहे तर दुसरीकडे बाजारात मालाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. म्हणून आता सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये.
दरम्यान दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दरात विक्री होणारे सोयाबीन आता सहा हजाराच्या घरात पोहोचले आहे. सोयाबीनला काल झालेल्या लिलावात विक्रमी 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
अर्थातच बाजारभावाची वाटचाल आता सहा हजाराच्या दिशेने होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात सोयापेंड आणि सोयाबीन दरात वाढ होत आहे.
ब्राझीलमध्ये दुष्काळी परिस्थिती तयार झाली असल्याने त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादनात घट येणार आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात आता सोयाबीन आणि सोयापेंड भाव वाढत आहेत. यामुळे प्रमुख एशियन राष्ट्रांमध्ये भारताच्या सोयापेंड आणि सोयाबीनची मागणी वाढली आहे.
अमेरिकन सोयापेंडपेक्षा भारतीय सोयापेंड महाग आहे पण एशियन राष्ट्रांमध्ये अमेरिकन सोयापेंड पेक्षा भारतीय सोयापेंड स्वस्त पडते. यामुळे त्या देशांमध्ये भारतीय मालाची मागणी वाढली आहे. हेच कारण आहे की सध्या बाजार भावात तेजी आली आहे.
सोयाबीनला काय भाव मिळतोय
सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला पाच हजार पन्नास ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळत आहे. पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यातील समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी ५४०० रुपयांचा भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये काल सोयाबीनला किमान 4200, कमाल 5400 आणि सरासरी 4805 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.