पुणे वेधशाळेचा नवीन हवामान अंदाज ! थंडीचा जोर वाढला, पण महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानातं सातत्याने बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात हलका ते मध्यम पाऊस झाला होता.

या पावसामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण हा पाऊस त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसाठी आणि रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरला आहे.

म्हणजेच अवकाळी पावसामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील काही शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तर काही शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.

मात्र आता राज्यातील कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. रात्रीच्या तापमानात घट होत असल्याने रात्री आता थंडी भासू लागली आहे.

पण अशातच बंगालच्या उपसागरात एका नवीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली देशातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे.

दरम्यान पुणे हवामान विभागाने महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे, सध्या राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पुढील दोन ते तीन दिवसात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसची कपात होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता असून त्या भागात गारठा वाढणार आहे.

तथापि, राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे देखील वेधशाळेने आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.

कुठे बरसणार अवकाळी 

राज्यासह देशात थंडीचा जोर वाढतोय. कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याने गुलाबी थंडीची आता जाणीव होऊ लागली आहे. पण अजूनही थंडीची तीव्रता म्हणावी तशी वाढलेली नाही.

मात्र, आगामी काही दिवसात थंडीचा जोर वाढणार असे हवामान तज्ञांनी नमूद केले आहे. दरम्यान वेधशाळेने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 24 नोव्हेंबरला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Pune Weather Department नुसार २३ नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेनं येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रातील कमाल तापमान वाढणार आहे.

यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. २४ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलका पाऊस पडणार आहे.

Leave a Comment