Soybean Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. खरतर, राज्यातील जवळपास 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांचे पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबित्व आहे. पण दिवाळीपूर्वी सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता.
त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आले होते. एकतर मान्सून काळात राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. राज्यातील बहुतांशी गावांना दुष्काळाची झळ बसली आहे.
यामुळे सोयाबीन, कापूस, मका या मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. उत्पादनात घट आली असल्याने यंदा शेतमालाला चांगला दर मिळणार आणि उत्पादनात आलेली घट अन होणारे नुकसान विक्रमी भावामुळे भरून निघणार अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती.
पण हंगामाच्या अगदी सुरुवातीलाचं सोयाबीनला आणि कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. सोयाबीन 4000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकले जात होते. तर कापसाला सहा हजार रुपये प्रति आसपास भाव मिळत होता.
दरम्यान दिवाळीच्या काळात राज्यातील बहुतांशी बाजार बंद समित्या बंद होत्या. पण आता गेल्या आठवड्याभरापासून सामसूम असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या पुन्हा एकदा गजबजू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा देखील झाली आहे. आता सोयाबीनला एम एस पी अर्थातच मिनिमम सपोर्ट प्राईस पेक्षा अधिक भाव मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे आगामी काळात सोयाबीन दरात आणखी भाव वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. बियाण्यासाठीच्या सरासरी सोयाबीनचा बाजार भाव आता पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे.
तसेच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5000 ते 5176 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे. भारतातील सोयाबीनला परदेशात मोठी मागणी आली आहे आणि हेच कारण आहे की, आता सोयाबीन बाजारभावात तेजी आली असून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापर्यंत ही तेजी कायम राहणार असा अंदाज आहे.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, जागतिक बाजारात सोयापेंडचा भाव सातत्याने वाढत आहे. सोयापेंडला जागतिक बाजारात येत्या आणखी चांगला भाव मिळणार असा अंदाज आहे. परिणामी भारतीय सोयापेंडला मागणी वाढणार असे सांगितले जात आहे.
तसेच यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोयाबीनचा भाव पुढील दोन महिन्यांत ५ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार करणार असे मत बाजार अभ्यासकांनी यावेळी वर्तवले आहे.