Soybean Rate Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन नेहमीच चांगल्या दरात विकली गेले आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षा प्रमाणे भाव मिळाला नाही मात्र तरीही गत हंगामात सोयाबीन हमीभावापेक्षा अधिकच्या दरात विकले गेले होते.
परिणामी यावर्षी पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर असतांनाही शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच विश्वास दाखवला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी झाली आहे. परंतु या चालू हंगामात शेतकऱ्यांना अगदी पीक पेरणीपासून विविध संकटांचा सामना करावा लागला आहे.
सुरुवातीला कमी पाऊस होता यामुळे पेरणीला उशीर झाला. कशीबशी पेरणी झाली मात्र मध्यंतरी हवामान बदलामुळे आणि कमी पावसामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. काही भागात येलो मोजॅक हा रोगही पाहायला मिळाला. दरम्यान या साऱ्या संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी आता सोयाबीनचे पीक पदरात घेतले आहे. मात्र उत्पादनात कधी नव्हे ती घट आली आहे.
काही शेतकऱ्यांना एकरी मात्र दोन ते तीन क्विंटल चे उत्पादन मिळाले आहे. अशा या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. परंतु नवीन सोयाबीन बाजारात येताच बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. 13 ऑक्टोबरला अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीन मात्र तीन हजार 900 रुपये प्रतिक्विंटल एवढ्या कवडीमोल दरात विकले गेले आहे.
मात्र काल या बाजारात सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे. म्हणजेच बाजार भावात चारशे रुपयांची वाढ झाली आहे. मात्र हा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडणारा नाहीये. याआधी 2012 मध्ये सोयाबीनला एवढा कमी दर मिळाला होता. 2012 मध्ये सोयाबीन चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलच्या आसपासच्या सरासरी बाजार भावात विकले गेले होते.
तेव्हापासून मात्र नेहमीच सोयाबीन तेजीत राहिले आहे. यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. जवळपास 11 वर्षानंतर सोयाबीनचे बाजार भाव निच्चाकी पातळीवर पोहोचले आहेत.
बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या वर्षी केंद्र सरकारने तेलाचे आयात शुल्क ३५ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आणले असल्याने तेलाचे भाव पडले आहेत. याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात घसरण होत आहे. याशिवाय डीओसीच्या दरात घसरले आहेत आणि मागणी देखील घटली आहे.
म्हणून याचा दरावर परिणाम झालेला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी नाफेडच्या माध्यमातून सोयाबीनची खरेदी सुरू केली पाहिजे अशी मागणी केली आहे. यापूर्वी 2017-18 मध्ये नाफेडच्या माध्यमातून हमीभावात सोयाबीनची खरेदी झाली आहे.
यामुळे यंदा सोयाबीनची नाफेड कडून खरेदी होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान जाणकार लोकांनी नाफेडकडून जर सोयाबीन खरेदी सुरू झाली तर कदाचित बाजार भावाला थोडासा आधार मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.