Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी सोयाबीन उत्पादकांसाठी अधिक खास राहणार आहे. सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोन म्हणून ओळखतात. हे एक नगदी पीक असून शेतकऱ्यांना या पिकातून तात्काळ पैसा उपलब्ध होतो.
मात्र गेल्या दोन हंगामापासून हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असा पैसा मिळत नाहीये. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता मात्र गेल्या हंगामात सोयाबीन अपेक्षित अशा बाजारभावात विकला गेला नाही.
यामुळे शेतकरी बांधवांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. खरंतर राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे.
पण गेल्या हंगामाप्रमाणेच या चालू हंगामातही सोयाबीनचे बाजारभाव दबावातच आहेत. यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत. मात्र आता सोयाबीनच्या बाजारभावात हळूहळू भाववाढ होत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनच्या आगारात अर्थातच विदर्भात आता दरवाढ पाहायला मिळत आहे.
अकोला एपीएमसीमध्ये बाजारभावात वाढ नमूद करण्यात आली असून पिवळं सोनं आता 5,000 च्या घरात पोहोचल आहे. कालच्या लिलावात अर्थातच 30 ऑक्टोबर रोजी अकोला एपीएमसी मध्ये कमाल बाजारभावात 125 रुपयांची वाढ झाली आहे. काल अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4925 रुपये एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून सरासरी बाजार भाव 4700 रुपये नमूद करण्यात आला आहे.
28 ऑक्टोबरला या बाजारात सोयाबीनला फक्त चार हजार रुपये ते 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. म्हणजेच काल या मार्केटमध्ये कमाल बाजारभावात 125 रुपये आणि सरासरी बाजार भावात शंभर रुपयाची घसघशीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे लवकरच सोयाबीनला 5 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळेल असे चित्र देखील आता तयार होत आहे.
यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा सण येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैशांची निकड भासणार आहे. अशातच आता सोयाबीन दरात सुधारणा झाली असल्याने यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
खरतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे. पण तरीही बाजारात तेजी पाहायला मिळत असल्याने आगामी काळासाठी हे चांगले संकेत समजले जात आहेत. पण आता भविष्यात ज्यावेळी संपूर्ण राज्यात सोयाबीनची आवक वाढेल तेव्हा सोयाबीनला काय भाव मिळतो यावरच शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने भवितव्य अवलंबून राहणार आहे.