सोयाबीनच्या कोणत्या जातीची लागवड केल्यास मिळणार अधिकचे उत्पादन ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Variety In Marathi : जर तुम्हीही यंदा सोयाबीन लागवड करण्याच्या तयारीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील हवामानात उपयुक्त अशा सोयाबीनच्या टॉप तीन जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सोयाबीनला येलो गोल्ड म्हणजेच पिवळं सोनं म्हणून ओळखतात. हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाला नगदी पिकाचा देखील दर्जा देण्यात आला आहे. कारण की यातून तात्काळ पैसा उपलब्ध होतो.

याची लागवड खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात देखील सोयाबीनची लागवड करतात मात्र उन्हाळ्यात प्रामुख्याने बीज उत्पादनासाठी याची लागवड होते. अर्थातच याची व्यावसायिक शेती फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळते.

याची शेती ही राज्यातील विदर्भ, मराठवाडा या विभागात मोठ्या प्रमाणात केली जाते. शिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

दरम्यान, आज आम्ही सोयाबीनची व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीनच्या काही प्रमुख जातींची माहिती घेऊन आलो आहोत.

सोयाबीनच्या प्रमुख जाती आणि त्यांच्या विशेषता

के डी एस 992 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाने विकसित केलेले केडीएस 992 अर्थातच फुले दुर्वा हे वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या जातीचा पीक परिपक्व कालावधी 100 ते 105 दिवस एवढा आहे.

या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हार्वेस्टर ने याची हार्वेस्टिंग केली जाऊ शकते. हा वाण तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

सोयाबीन गोल्ड 3344 : या जातीचे पीक 100 ते 105 दिवसात काढण्यासाठी तयार होते. या जातीचे पीक कापणीला उशीर झाला तरी देखील शेंगा फुटत नाहीत, तुटत नाहीत. यामुळे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येते.

केडीएस 726 : फुले संगम अर्थातच केडीएस 726 या जातीची आपल्या महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ तथा पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.

फुले संगम हा सोयाबीनचा वाण 100 ते 105 दिवसात काढण्यासाठी तयार होतो. खोडमाशी, मुळकुज कोळकुज अशा रोगांमध्ये ही जात मध्यम प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. 

Leave a Comment