धक्कादायक ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना अजूनही नाही मिळाला 4% महागाई भत्ता वाढीचा लाभ, कर्मचारी झालेत आक्रमक 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee DA Hike : राज्य शासनाने गेल्या महिन्यात 30 जून रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयानुसार, शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. याआधी राज्य कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता म्हणजे डीए मिळत होता.

मात्र शासनाने यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चार टक्के एवढी वाढ केली. अर्थातच आता राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के दराने DA मिळणार आहे. विशेष बाब अशी की, राज्य शासनाने केलेली ही वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञेय करण्यात आली आहे.

तसेच याचा रोखीने लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत दिला जात आहे. मात्र अशातच एक अतिशय शॉकिंग बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील काही कर्मचाऱ्यांना अद्याप महागाई भत्ता वाढीचा हा लाभ मिळालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अजूनही 4% डीएवाढीचा लाभ मिळालेला नाही. यामुळे संबंधितांमध्ये शासनाविरोधात नाराजी पाहायला मिळत आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात एक मोठी घोषणा केली होती.

यात त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या धरतीवर महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल असे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली ही घोषणा एक जुमला सिद्ध झाली आहे.

कारण की, राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झालेली असतानाही एसटी कर्मचाऱ्यांना DA वाढ लागू झालेली नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

वास्तविक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी महामंडळ मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अगोदरपासूनच शासकीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर महागाई भत्ता वाढ दिली जाते.

म्हणजे मुख्यमंत्री महोदय यांनी जुनाच निर्णय नवीन वाचून दाखवला होता. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही प्रलंबित चार टक्के डीए वाढ मिळालेली नसल्याने सध्या शासनाविरोधात संबंधितांचा रोष आणखी वाढू लागला आहे.

Leave a Comment