मोठी बातमी ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात झाली ‘इतकी’ कपात, सुधारित तिकीट दर किती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Solapur Vande Bharat New Ticket Rate : भारतीय रेल्वेने 2019 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल केली. रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली.

यानंतर मग भारतीय रेल्वेने देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा सपाटा चालवला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई-सोलापूर या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही गाडी पुण्यामार्गे धावत असल्याने मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा फायदा झाला आहे.

या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद गतीने होत आहे. या गाडीला सुरुवातीच्या टप्प्यात मोठा उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, आता या गाडीच्या तिकीट दरामुळे प्रवाशांनी या गाडीकडे पाठ फिरवली आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच देशातील इतरही मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासी संख्येत मोठी घट आली आहे.

यामुळे वंदे भारत एक्सप्रेस चेअर कारसहीतच सर्व एक्झिक्यूटिव्ह कोचचे तिकीट दर 25% पर्यंत कमी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेसचे दर साधारणता दोनशे रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.

गेल्या 30 दिवसात ज्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये 50% पेक्षा कमी प्रवासी संख्या होती त्या गाड्यांचे तिकीट दर कमी होणार आहेत. यानुसार मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे देखील तिकीट दर कमी होण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सोलापूर ते पुणे असा वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारने प्रवास केल्यास प्रवाशांना 885 रुपये एवढे तिकीट लागते.

तसेच एक्झिक्यूटिव्ह चेअर कारसाठी 1575 रुपये लागतात. तसेच सोलापूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास करण्यासाठी एसी चेअर कारमध्ये तेराशे रुपये लागतात आणि एक्झिक्यूटिव्ह चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी 2185 रुपये लागतात. यामध्ये ब्रेकफास्ट तसेच जेवणाचे रेटचा समावेश करण्यात आलेला नाही.

दरम्यान, आता या तिकीट दरात दीडशे ते दोनशे रुपयांची कपात केली जाणार आहे. यानुसार, मुंबई-सोलापूर हा प्रवास आता साडेसहाशे रुपयात केला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. दरम्यान तिकीट दरात कपात झाली तर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासी संख्येत वाढ होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

Leave a Comment