State Employee News : राज्य शासनाने काल अर्थातच 5 डिसेंबर 2023 रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून राजधानी मुंबईसह उपनगरांमधील शासकीय निमशासकीय कार्यालयांना आणि शाळांना आज अर्थातच 6 डिसेंबर 2023 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
खरे तर आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने आंबेडकरवादी जनता डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी एकवटणार आहेत.
यंदा जवळपास दहा लाख भीमअनुयायी चैत्यभूमीवर जमा होणार असा अंदाज आहे. यामुळे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून विशेष लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यामुळे भीम अनुयायींना बाबासाहेबांचे दर्शन घेणे सोपे होणार आहे.
अशातच आता राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज मुंबई आणि उपनगरातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे.
सदर परिपत्रकात अर्थातच शासन निर्णयात अनंत चतुर्दशी आणि गोपाळकाल्याच्या दिवशी 2007 पासून मुंबई शहरातील आणि उपनगरातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सुट्टी दिली जात आहे. दरम्यान यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त देखील सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला वंदन करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनाच जाता यावे यासाठी मुंबई शहरातील आणि उपनगरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना तसेच शाळेला सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान सरकारने ही मागणी पूर्ण केली असून आज मुंबईसह उपनगरातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. शिवाय शाळेला देखील सुट्टी दिली जाणार आहे.
यामुळे मुंबई शहरातील शासकीय आणि निम शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्यासाठी चैत्यभूमीवर हजेरी लावता येणार आहे.