शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! 11 ते 15 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस : पंजाब डख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : पंजाब डख यांनी नुकताच 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या कालावधीत पश्चिम विदर्भात रिमझिम स्वरूपाचा तर पूर्व विदर्भात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमरावती, वाशिम, यवतमाळ, चांदूरबाजार, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यात रिमझिम पाऊस पडणार असा अंदाज आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात ढगाळ हवामान राहणार असे त्यांनी नमूद केले आहे.

याशिवाय पंजाबरावांनी 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस थैमान घालणार असे म्हटले आहे.

पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, 11 डिसेंबरच्या सुमारास अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होणार आहे.

हे चक्रीवादळ पुढे ओमानच्या दिशेने सरकणार आहे. मात्र हे चक्रीवादळ जात असताना राज्यातील दक्षिण भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे.

या कालावधीत राज्यात Heavy Rainfall होईल असं त्यांनी म्हटले आहे. या कालावधीमध्ये राज्यातील दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कोकणातील सर्व जिल्हे, अहमदनगर, सोलापूर या भागात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

११ डिसेंबर नंतर सुरू होणारा पाऊस हा जवळपास 16 डिसेंबर पर्यंत सुरूच राहील. या काळात उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असं त्यांनी सांगितले आहे.

एकंदरीत, 15-16 डिसेंबर पर्यंत राज्यातील हवामान बिघडलेलेचं राहणार आहे. यामुळे आता डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तरी थंडीचा जोर वाढतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment