राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! सातवा वेतन आयोगाचा उर्वरित पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या थकबाकी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरंतर राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यात देऊ केली जात आहे.

यानुसार आत्तापर्यंत राज्यातील काही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे थकबाकीचे सर्व हफ्ते देऊ करण्यात आले आहेत. काही कर्मचाऱ्यांना चारही हप्ते मिळाले आहेत तर काही कर्मचाऱ्यांना फक्त पहिलाच हप्ता मिळाला आहे. अजूनही अनेक कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचे हफ्ते बाकी आहेत.

दरम्यान सातवा वेतन आयोग थकबाकी देणे बाकी असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हफ्ते देण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता मिळालेला नाही अशा कर्मचाऱ्यांना आता ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते देऊ केले जाणार आहेत. यामध्ये राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हफ्ते अदा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या बहुतांशी शिक्षकांना अद्याप सातवा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातवा वेतन आयोगाचे थकीत हफ्ते लवकरात लवकर मिळावे यासाठी पाठपुरावा केला जात होता.

दरम्यान आता जिल्हा परिषद शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी 96,97,26,000/- रुपये, थकबाकीचा दुसरा हप्ता अदा करण्याकरीता 893,70,59,000 रुपये, तिसरा हप्ता अदा करण्यासाठी 9666,45,65,000 रुपये आणि चौथा हप्ता देण्यासाठी 1150,00,00,000 रुपये इतका ‍निधी तसेच इतर प्रकारचे देयके सादर करण्यासाठी 84,70,71,000 रुपये इतका निधी वितरीत करण्यास प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

दरम्यान यासाठीची पुरवणी मागणी पावसाळी अधिवेशनात सादर होणार आहे. ही पुरवणी मागणी आता मंजूर होणार असून यानंतर या संबंधित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता वितरित करण्यास सुरुवात होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत या बाकी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते मिळणार आहेत. 

Leave a Comment