पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी…! आजपासून सुरु होणार विस्तारित मेट्रो मार्ग ; रूट, टाईमटेबल, तिकीट दरविषयी सर्व माहिती वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Metro News : एक ऑगस्ट 2023 म्हणजे आजचा दिवस हा पुणेकरांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज पुणेकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक मोठी भेट मिळणार आहे. आज पीएम मोदी पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शहरातील विस्तारित मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

आज दुपारी बारा वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी स्टेशन ते सिविल कोर्ट स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिकपर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे उद्घाटन झाल्यानंतर हे मार्ग लगेचच प्रवाशांसाठी खुले होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3 वाजेपासून हे मार्ग प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत. निश्चितच पुणे मेट्रोचे हे विस्तारित मार्ग सुरू झाले तर शहरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मदत मिळणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास हा सुपरफास्ट होणार आहे.

ही मार्गिका खुली केल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रस्ता), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे मनपा, दिवाणी न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज आदी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत.

यामुळे या भागातील नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. दरम्यान, आज आपण पुणे मेट्रोच्या या विस्तारित मेट्रोचे टाईम टेबल आणि तिकीट दर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पुणे मेट्रोचे टाईम टेबल कसंय ?

महामेट्रोकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मेट्रोचे गरवारे महाविद्यालय ते रुबी रुग्णालय आणि फुगेवडी ते दिवाणी न्यायालय हे मार्ग आजपासून सुरु होणार आहेत. आज दुपारी तीन वाजेपासून या मार्गांवर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या विस्तारित मेट्रो मार्गावर दर दहा ते पंधरा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.

मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 ते 11 या वेळेत म्हणजे पीक अवर्समध्ये (गर्दीच्या वेळी) दर 10 मिनिटाला आणि 11 ते 2 या वेळात दर 15 मिनिटाला मेट्रो धावणार आहे. सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. मेट्रो प्रत्येक स्थानकावर 30 सेकंद थांबणार आहे. आठवड्यातील सातही दिवस मेट्रो धावणार आहे.

किती असणार तिकीट दर ? 

वनाझ ते रुबी हॉल : २५

पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : ३०

वनाझ ते पिंपरी-चिंचवड : ३५

रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : ३०

वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान/पीएमसी : २०

वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन : २५

रुबी हॉल ते शिवाजीनगर : १५

रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : २०

पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : ३०

या लोकांना मिळणार तिकीट दरात सवलत

पुणे मेट्रो मध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. यात पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिकीट दरात 30% सवलत दिली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष बाब अशी की, शनिवारी तसेच रविवारी सर्वसामान्य प्रवाशांना देखील 30% सवलत मेट्रो प्रवासात दिली जाणार आहे.

यासोबतच मुंबई मेट्रोमध्ये ज्याप्रमाणे कार्डधारकांना सवलत दिली जात आहे तशीच सवलत पुणे मेट्रोमध्ये देखील मिळणार आहे. येत्या काही दिवसात पुणे मेट्रो प्रवासासाठी कार्ड कार्यान्वित केले जाणार असून या कार्डवर 10 टक्के सवलत दिली जाणार आहे.

Leave a Comment