State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजना अर्थातच ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी ही मंडळी वेळोवेळी आंदोलने देखील करत आहे.
यासाठी मार्च महिन्यात या मंडळीने बेमुदत संप देखील पुकारला होता. या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे सरकारने या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी एका तीन सदस्य समितीची स्थापना केली होती. या समितीचा अहवाल नुकताच राज्य शासन दरबारी जमा झाला आहे.
त्यामुळे आता या अहवालावर काय निर्णय घेतला जातो, या अहवालात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काय शिफारशी देण्यात आल्या आहेत याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, या अहवालावर 14 डिसेंबर पर्यंत निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा संपावर जाऊ असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता लवकरच वाढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करणे बाबतचा प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन असल्याचे सांगितले आहे.
खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. याशिवाय देशातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट एज 60 वर्षे आहे. एवढेच नाही तर आपल्या महाराष्ट्रातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ग्रुप ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात आले आहे.
मात्र राज्यातील ग्रुप अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले पाहिजे अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.
त्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. आतापर्यंत हजारो वेळा या संदर्भात निवेदने देखील देण्यात आली असतील. मात्र अजूनही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
मात्र पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील पुढील वर्षी घेतल्या जाणार असल्याने आता या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दस्तुर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री महोदय यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबतचा प्रस्ताव सध्या शासनाकडे विचाराधीन असल्याचे सांगितले आहे. यामुळे या प्रस्तावावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होईल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.