State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी धक्का देणारी बातमी समोर येत आहेत. ती म्हणजे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे तब्बल 800 कोटी रुपये थकल्याचे वृत्त हाती आले आहे.
विशेष म्हणजे याची माहिती राज्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत विधानपरिषदेत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युईटीचे पैसे थकले आहेत.
खरंतर एसटी महामंडळ गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आले आहे. विशेषता कोरोना काळापासून महामंडळाची आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी देखील एसटी महामंडळाकडे पैसे नाहीत. यामुळे पुढील चार वर्ष कर्मचाऱ्यांचे वेतन शासकीय अर्थसंकल्पातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अशातच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मार्ग परिवहन महामंडळ अजूनही 1100 कोटी रुपयाच्या तुटीत आहे. यामुळे महामंडळाकडे कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी व उपदान देण्यासही पैसे नसल्याचे सांगितले जात आहे.
अशातच विधान परिषदेत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे देणीबाबत प्रश्न उपस्थित झाला असता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे 486 कोटी तर ग्रॅच्युइटीची 273 कोटी रुपयांची देणी थकली आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विधानपरिषदेत विधानपरिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री महोदय यांनी याच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.
तसेच मुख्यमंत्री महोदय यांनी महामंडळाच्या आर्थिक परिस्थिती पाहता पुढील चार वर्षे महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच त्यांच्या वैद्यकीय देयकांची मार्च 2023 पर्यंतची रक्कम देण्यात आली असून जी देयके प्रलंबित आहेत तो निधी देखील उपलब्धतेनुसार दिला जाईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सभागृहाला दिले आहे.