State Employee News : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, काल अर्थातच 13 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य शासनाने कर्मचाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेत. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याच्या निर्णयाचा देखील समावेश आहे.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत कंत्राटी ग्रामसेवकांना 6000 रुपये प्रतिमहिना मानधन मिळत होतं. मात्र आता शासनाने यात 10000 रुपये मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे.
म्हणजे आता या कर्मचाऱ्यांना सोळा हजार रुपये प्रति महिना एवढ मानधन मिळणार आहे. दरम्यान आज राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात शासनाने एक मोठी घोषणा केली आहे. आज 14 जून 2023 रोजी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे.
आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जात नव्हता. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. दरम्यान ही मागणी आज पूर्ण झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय सेवेतील कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मोठी घोषणा केली आहे.
खरंतर आज एसटीचा वर्धापन दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. एसटीच्या वर्धापनात दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. निश्चितच एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही घोषणा दिलासादायक सिद्ध होणार असून शासनाच्या या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.