तूर लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Lagwad : राज्यात चार दिवसांपूर्वी मान्सून आगमन झाले आहे. पण अद्याप मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. आधीच यावर्षी मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले आहे आणि आता मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान नसल्याचे सांगितले जात आहे.

निश्चितच यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून मोसमी पावसाला केव्हा सुरुवात होते आणि केव्हा पिक पेरणीला सुरुवात होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. खरंतर खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

परंतु गेल्या हंगामात या दोन्ही शेतीमालांना अपेक्षित असा दर मिळाला नाही. कापसालाही आणि सोयाबीनलाही चांगला बाजार भाव मिळाला नसल्याने या हंगामात या दोन्ही पिकांच्या लागवडीत किंचित घट येऊ शकते असा अंदाज आहे. म्हणून तूर लागवडीखालील क्षेत्र वाढेल असे मत व्यक्त होत आहे.

अशा परिस्थितीत आज आपण तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. आज आपण तुरीच्या काही सुधारित वाणाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया तूरीच्या सुधारित जाती.

तुरीच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे :

टी ए टी 10 – महाराष्ट्रात उत्पादित होणारा हा एक मुख्य वाण आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरीचे हे वाण 110 ते 120 दिवसांत परिपक्व होते. या जातीच्या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून प्रति हेक्टर जवळपास आठ ते नऊ क्विंटल उत्पादन या जातीपासून मिळते. 

आय सी पी एल 87- राज्यात उत्पादित होणारा हा देखील एक मुख्य वाण आहे. या जातीची शेती राज्यात मोठया प्रमाणात केली जात असून या जातींचे पिक 120 ते 125 दिवसात परिपक्व बनते. या जातीपासून 9 ते दहा क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. 

एके पीएच 4101- तुरीची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रात तर लागवड होतेच याशिवाय गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात देखील या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या जातीचे पीक जवळपास 135 ते 140 दिवसांत परिपक्व होत असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे. या जातीचे दाणे लाल असतात आणि मध्यम आकाराचे असतात. 

एके टी 88 11 – तुरीची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीची पेरणी केल्यानंतर सरासरी 145 ते 150 दिवसात उत्पादन मिळते. दहा ते अकरा क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन या वाणातून शेतकऱ्यांना मिळू शकते असा दावा केला जात आहे.

Leave a Comment