सोयाबीन लागवड : महाराष्ट्रातील हवामानात चांगल्या उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या प्रमुख जाती कोणत्या? त्यांच्या विशेषता काय? वाचा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming : सोयाबीन ज्याला शेतकरी पिवळं सोन अर्थातच येलो गोल्ड म्हणून ओळखतात. याला कारणही तसं खासच आहे. खरंतर सोयाबीन पिकाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना चांगले शाश्वत उत्पन्न मिळवून देणे आहे. पण गेल्या हंगामात सोयाबीनने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. सोयाबीन उत्पादकांना किमान सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दराची आशा होती मात्र सोयाबीन 4000 पर्यंतच्या किमान बाजारभावात गेल्या हंगामात विकावा लागला आहे.

तसेच सरासरी दर पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पाहायला मिळाले होते. यामुळे गेल्या हंगामात सोयाबीन उत्पादकांना उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. मात्र शेतकऱ्यांनी ही गोष्ट बाजूला सारून नवीन हंगामासाठी जोमाने तयारी सुरू केली आहे. या हंगामात सोयाबीन उत्पादकांना चांगले दर मिळण्याची आशा आहे. सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव पीक पेरणीपूर्व कामे करण्यात व्यस्त असून पेरणी योग्य पाऊस झाला की पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे.

वास्तविक यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला आहे. मान्सून अजूनही राज्यातील दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचलेला नाही. येत्या काही तासात मात्र मान्सूनचा पुढील प्रवास सुरु होईल आणि पुढील काही दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. म्हणून मोसमी पावसाच्या आगमनानंतर राज्यात सोयाबीन पेरणीला वेग येणार आहे.

राज्यातील कृषी विभागाने मात्र शेतकऱ्यांना 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पिक पेरणीला सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच 26 जुलै नंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पेरणी करू नये असे सांगितले आहे. म्हणजे जर 26 जुलै पर्यंत पेरणी योग्य पाऊस झाला नाही तर सोयाबीन ऐवजी दुसऱ्या पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान आज आपण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनच्या सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

सोयाबीनच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे

जे.एस. 335 :- ज्या शेतकऱ्यांकडे मध्यम ते भारी जमीन असेल अशा शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड केली पाहिजे. हा वाण महाराष्ट्रासाठी शिफारशीत आहे. अर्थातच राज्यातील हवामान या जातीला मानवते. पीक पेरणी केल्यानंतर साधारणतः शंभर ते 105 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. या जातीपासून 25 ते 28 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढे विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा काही तज्ञांनी केला आहे.

पी.डी.के.व्ही. सुवर्णसोया :- महाराष्ट्रामध्ये उत्पादित होणाऱ्या विविध जातींमध्ये यादेखील जातीचा समावेश होतो. ही सोयाबीनची एक प्रमुख जात असून मराठवाडा कृषी विद्यापीठ अर्थातच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. सोयाबीनची ही जात 98 ते 100 दिवसात परिपक्व बनते. अर्थातच पीक परिपक्व कालावधी या जातीचा कमी आहे. कमी कालावधीत या जातीपासून चांगले उत्पादन मिळते. या जातीपासून साधारणता 25 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

इंदोर सोया 138( एन.आर.सी 138) :- ही जात सोयाबीन संशोधन संस्था इंदोर येथे विकसित झाली आहे. मध्यप्रदेशमध्ये या जातीचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात देखील ही जात कमी अधिक प्रमाणात उत्पादित होत आहे. ही जात येलो मोझॅक या रोगास प्रतिकारक आहे. पेरणी केल्यानंतर मात्र 90 ते 94 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. जवळपास 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन या जातीमधून प्राप्त केले जाऊ शकते. अर्थातच कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन देणारी ही जात आहे. यामुळे या जातीची शेती करण्यावर शेतकरी भर देत आहेत. पण शेतकऱ्यांनी कोणत्याही जातीची निवड करण्यापूर्वी आपल्या जमिनीच्या मगदूराचा आणि हवामानाचा विचार करणे आवश्यक आहे. या कामी शेतकरी बांधव कृषी तज्ञांचा आणि कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेऊ शकतात.

Leave a Comment