State Employee News : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई मधील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबईमधील बेस्टचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून संपावर गेले होते.
यामुळे मुंबईकरांचा प्रवास मोठा मुश्किल झाला होता. मुंबईकरांना बेस्टचे कर्मचारी संपावर असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संपात मुंबईच्या सर्वच डेपो मधील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामुळे डेपोमध्ये प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या.
गेल्या आठ दिवसांपासून हा संप अविरतपणे सुरू होता परिणामी यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना सर्वाधिक अडचणीचा सामना करावा लागला. अनेकांना या संपामुळे कामावर जाण्यास उशीर होत होता, तर अनेकांना घरी जाण्यास उशीर होत होता.
अशा परिस्थितीत शासनावर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी दबाव वाढत होता. दरम्यान सोमवारी मध्य रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री सोमवारी जेजुरी दौऱ्यावर असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासनाच्या माध्यमातून देण्यात आले असल्याने कर्मचाऱ्यांनी आज संप मागे घेतला आहे.
निश्चितच बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा हा संप त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. दरम्यान आता आपण बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या झाल्यात मान्य
आम्ही आपणास सांगू इच्छितो की बेस्टचे कंत्राटी कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी संपावर होते. यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना वार्षिक रजा ही भरपगारी करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजा ही भर पगारी मिळावी, कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्याची परवानी देण्यात यावी, कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस मिळावा, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढ करण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या आठ दिवसांचा पगार भरून देण्यात यावा, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही या प्रमुख मागण्या होत्या.
आता या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याने बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. निश्चितच संप मागे घेतला गेला असल्याने आता सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.