State Employee News : आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. मराठी नवीन वर्षाला आजपासून सुरवात होणार आहे. मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याला अर्थातच चैत्र मासाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळामध्ये सुद्धा राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पश्चिम विदर्भ विभागातील उच्च शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ऐन सणासुदीच्या काळात रखडले आहे.
या संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून रखडले असल्याने सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला आहे. शासनाकडून वेळेत अनुदान प्राप्त न झाल्याने या सदर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.
यामुळे त्यांचा गुढीपाडव्याचा सण आर्थिक अडचणीत गेला आहे. राज्यातील तब्बल साडेपाच हजार वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे.
अमरावतीसह राज्यातील दोन विभागातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे वेतन झालेले नाही.
उच्च शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्यां विविध शाखांच्या वरिष्ठ महाविद्यालयातील आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अमरावती विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन उच्च शिक्षण विभागाच्या अमरावती येथील सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयामार्फत केले जाते.
दरम्यान यासंबंधीत महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन आता एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही झालेले नाही.
शासनाकडून वेळेवर अनुदान उपलब्ध न झाल्याने वेतन रखडले आहे. आता मात्र शासनाकडून हे अनुदान उपलब्ध झाले आहे. यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना आता येत्या एक ते दोन दिवसात वेतन मिळणार आहे.
मात्र, सणासुदीच्या काळामध्ये दोन महिन्यांचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय ही वास्तविकता आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्याचे वेतन दरवर्षीच उशिराने मिळते अशी तक्रार या सदर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.
यंदा तर फेब्रुवारी महिन्याचे वेतन सुद्धा रखडले असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली आहे. पण आता लवकरच या सदर कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार अशी माहिती समोर आलीये. म्हणून आता या कर्मचाऱ्यांचा रोष काहीसा कमी होणार असे बोलले जात आहे.