राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार ‘हा’ लाभ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee Payment : जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी राज्य शासकीय सेवेत नोकरी करत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो.

पहिला लाभ हा जानेवारी महिन्यापासून मिळतो तर दुसरा लाभ जुलै महिन्यापासून मिळतो. दरम्यान गेल्या महिन्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे. 30 जून 2023 रोजी यासाठीचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयानुसार, राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चार टक्के DA वाढ लागू करण्यात आली आहे.

ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असल्याने जानेवारीपासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना देण्याचे सदर निर्णयात नमूद करण्यात आले होते. हा महागाई भत्ता वाढीचा आणि DA फरकाचा लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे पेड ईन जुलै महिन्याच्या वेतनासोबत देण्याचे आदेशित करण्यात आले होते.

मात्र ज्यावेळी शासनाने याचा शासन निर्णय निर्गमित केला तेव्हा बऱ्याच विभागातील राज्य कर्मचाऱ्यांची वेतन बिले तयार झाली होती. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची वेतन बिले हा निर्णय जाहीर झाला तेव्हा तयार झालेले असतील अशा कर्मचाऱ्यांना या महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा रोखीने लाभ पुढील महिन्याच्या म्हणजेच जुलै महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे ऑगस्ट महिन्यात जें वेतन मिळेल त्यासोबत द्यावा असे कोषागार विभागाकडून निर्देशित करण्यात आले आहे.

अर्थातच आता ज्या कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळालेला नाही त्या कर्मचाऱ्यांना पुढल्या महिन्यात अर्थातच जुलै महिन्याच्या वेतनासोबत हा लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे राज्यातील निवृत्तीवेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देखील महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे. याचा जीआर 5 जुलै रोजी निर्गमित झाला असून पेन्शन धारकांनाही याचा रोखीने लाभ जुलै महिन्याच्या वेतनासोबतच मिळणार आहे.

Leave a Comment