Strawberry Farming : स्ट्रॉबेरी हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. उन्हाळा लागला की लालचुटक स्ट्रॉबेरी बाजाराची शान वाढवतात. उन्हाळ्यामध्ये स्ट्रॉबेरीला बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते. त्याला बाजारात चांगला भावही मिळतो. परिणामी शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळते.
हेच कारण आहे की राज्यातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आजूबाजूच्या परिसरात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेष म्हणजे राज्यातील इतरही अन्य भागांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक उत्पादित केले जाते. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड पाहायला मिळते.
येथील आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पीक घेतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे या भागातील आदिवासी शेतकरी बांधव स्वतःच स्ट्रॉबेरीचे पीक उत्पादित करतात आणि स्वतःच ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांची विक्री करतात. त्यामुळे त्यांना याचा चांगला फायदा होतो.
नाशिकसहित राज्यातील विविध भागांमधील प्रयोगशील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीमधून चांगली कमाई करून दाखवली आहे. तथापि, जर स्ट्रॉबेरीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित वाणाची लागवड करणे आवश्यक असते.
अशा परिस्थितीत आज आपण स्ट्रॉबेरीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
स्ट्रॉबेरीच्या सुधारित जाती कोणत्या
टियागा स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीचा हा एक सुधारित प्रकार आहे. या वाणाची अनेक प्रमुख स्ट्रॉबेरी उत्पादक भागांमध्ये लागवड केली जाते. यातून चांगले दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.
खरंतर स्ट्रॉबेरीची ही जात मूळची कॅलिफोर्नियाची आहे. परंतु स्ट्रॉबेरीचा हा वाण उष्ण हवामानात देखील चांगला वाढत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. परिणामी यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते.
टॉरे स्ट्रॉबेरी : स्टोबेरी चा हा देखील एक मुख्य वाण आहे. या जातीची सुद्धा विविध भागांमध्ये लागवड केली जाते. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. स्ट्रॉबेरीची ही जात रोगांना सहसा बळी पडत नाही. या जातीची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये हा वान चांगला लोकप्रिय बनलेला आहे.
बेलरुबी स्ट्रॉबेरी : या जातीचे स्ट्रॉबेरी फळ चवीला खूपच गोड आणि रुचकर आहे. यामुळे बाजारात याला नेहमीच अधिकचा भाव मिळतो. या जातीच्या एका फळाचे वजन 15 ग्रॅम पर्यंत भरत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.
अर्थातच या जातीपासून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे. या जातीचे स्ट्रॉबेरी लाल आणि चमकदार असतात. दिसायला आकर्षक असल्याने बाजारात यांना नेहमीच मागणी असते.