Swaraj Tractor : गेल्या काही वर्षांमध्ये शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पूर्वी शेतीची कामे पारंपारिक पद्धतीने केली जात. शेतीच्या मशागती पासून ते काढणीपर्यंत सर्व कामे बैल जोडीच्या साह्याने होत. मात्र आता बैलांच्या सहाय्याने होणारी सर्व कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात आहेत.
यामुळे शेतकऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचत असून उत्पादन खर्चात मोठी बचत होत आहे. ट्रॅक्टरने शेतीची कामे जलद होत असून यामुळे मजूर टंचाईवर देखील यशस्वीरीत्या मात करता येत आहे. देशभरात वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर शेतकरी बांधव उपयोगात आणत आहे.
अशातच शेतकऱ्यांसाठी एका अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील प्रमुख ट्रॅक्टर निर्माती कंपनी स्वराजने आपले नवीन पाच ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. स्वराज ही भारतातील एक प्रमुख ट्रॅक्टर निर्माती कंपनी आहे. या कंपनीचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर आपल्या दमदार इंजिनसाठी ओळखले जातात. या कंपनीचे ट्रॅक्टर शेती कामासाठी खूपच सरस आहेत. दरम्यान काल अर्थातच 4 सप्टेंबर 2023 रोजी स्वराज कंपनीने आपले पाच नवीन ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. कंपनीने 40 एचपी ते 50 एचपी क्षमता असलेले 5 नवीन ट्रॅक्टर काल मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत.
या नवीन ट्रॅक्टरच्या लॉन्चिंग वेळी कंपनीने असा दावा केला आहे की त्यांनी बाजारात आणलेले हे नवीन ट्रॅक्टर एकापेक्षा एक आहेत. हे ट्रॅक्टर लॉन्च करून कंपनीने 40 ते 50 HP क्षमता असलेल्या ट्रॅक्टरच्या सेगमेंटमध्ये कंपनीची पकड मजबूत करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे.
नव्याने लॉन्च झालेले ट्रॅक्टर कोणते?
कंपनीचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी काल कंपनीने लॉन्च केलेल्या पाच नवीन ट्रॅक्टर बाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीने ट्रॅक्टरचे पाच नवीन मॉडेल बाजारात आणले आहेत. यामध्ये 742xt, 744xt, 855fe, 744fe आणि 843XM यांचा समावेश आहे. स्वराज कंपनीने लॉन्च केलेले हे पाचही ट्रॅक्टर 40 ते 50 एचपी श्रेणीतील आहेत.
नवीन श्रेणी अतुलनीय शक्ती, विश्वासार्हता आणि नाविन्यपूर्ण शैली प्रदान करते, असा दावा कंपनीच्या माध्यमातून केला जात आहे. या ट्रॅक्टरची सर्वात मोठी विशेषता म्हणजे शेतकऱ्यांच्या देखभालीसारख्या अडचणी दूर करून कंपनी या सर्व ट्रॅक्टरसाठी सहा वर्षांची वॉरंटी देणार आहे.
कंपनी इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणारे ट्रॅक्टर लॉन्च करणार?
कंपनीच्या माध्यमातून जेव्हा शेतकऱ्यांकडून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इथेनॉलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची मागणी वाढेल तेव्हा इलेक्ट्रिक आणि इथेनॉल चालणारे ट्रॅक्टर लॉन्च केले जातील असे सांगितले गेले आहे.
सध्या कंपनीकडे इलेक्ट्रिक आणि इथेनॉल ट्रॅक्टरसाठी मागणी नसल्याचे देखील कंपनीने यावेळी नमूद केले आहे. मात्र कंपनीचे इंजिनियर्स हे ट्रॅक्टर बनवण्यासाठी देखील पूर्णपणे तयार आहेत, असं कंपनीने यावेळी स्पष्ट केल आहे.