Tata Solar Panel : महागड्या वीजबिलामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. वाढत्या वीज दरामुळे आता सर्वसामान्य इतर पर्यायी व्यवस्थेच्या शोधात आहेत. विशेष म्हणजे आता उन्हाळ्यात वीजबिलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात एसी, फ्रिज, फॅन, कुलर इत्यादी उपकरणांची संख्या वाढणार आहे आणि यामुळे साहजिकच वीज बिल देखील वाढणार आहे.
हेच कारण आहे की अलीकडे, सोलर पॅनल बसवायला पसंती दाखवली जात आहे. जर तुम्हालाही वीज बिल शून्यावर आणायचे असेल तर तुमच्यासाठी सोलर पॅनल हा सर्वोत्कृष्ट पर्याय ठरणार आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे सोलर पॅनल तुम्हाला उपलब्ध होतील.
त्यामध्ये टाटा कंपनीची सोलर पॅनल देखील ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहेत. दरम्यान आज आपण टाटा कंपनीचा तीन किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना कितीचा खर्च करावा लागू शकतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
3 KW चे सोलर पॅनल किती वीज तयार करते
सर्वसामान्य कुटुंबासाठी 3 किलो वॅटची सोलर सिस्टीम सर्वोत्तम राहणार आहे. कारण 3 किलो वॅटची सोलर पॅनल एका दिवसात अंदाजे 15KWH वीज निर्माण करण्यास सक्षम आहे.
म्हणजेच या सौर यंत्रणेच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील सर्व विद्युत उपकरणे आरामात चालवू शकता. फ्रीज, टीव्ही, लॅपटॉप, एसी, मायक्रोवेव्ह, एलईडी लाइट बल्ब, पंखे, कुलर इत्यादी सर्व उपकरणे तुम्ही 3 किलोवॅट सोलर सिस्टिमच्या मदतीने आरामात चालवू शकता.
खर्च किती करावा लागणार
टाटा कंपनीचे तीन किलो वॅट सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी खर्च किती येणार हा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की आपल्याकडे सोलर पॅनलचे प्रामुख्याने दोन प्रकार विशेष प्रचलित आहेत.
एक म्हणजे ऑफ ग्रीड सोलर पॅनल आणि दुसरा म्हणजे ऑन ग्रीड. दरम्यान जर तुम्ही टाटा कंपनीचा 3 KW ऑन ग्रीड सोलर पॅनल इन्स्टॉल केला तर तुम्हाला जवळपास 2 लाख 13 हजार रुपयांपासून ते 2 लाख 59 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागणार आहे.
दुसरीकडे टाटा कंपनीचा 3KW ऑफ ग्रीड सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. म्हणजेच ऑफ ग्रीड सोलर पॅनल किंचित महाग जाते.
याचे कारण म्हणजे ऑफ ग्रीड सोलर पॅनल मध्ये सौर यंत्रणेमधून तयार झालेली ऊर्जा बॅटरी मध्ये साठवली जाते. दुसरीकडे ऑन ग्रीड मध्ये अशी सुविधा उपलब्ध नसते.
म्हणजेच ऑन ग्रीड जेव्हा लाईट असेल तेव्हाच उपयोगात येणार आहे. मात्र ऑफ ग्रिड मध्ये लाईट गेली तरीदेखील विजेचा वापर करता येणार आहे.