Top 10 Youtube Channel : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. युट्युब, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम हे असे काही प्लॅटफॉर्म आहेत जिथे लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. युट्युब बाबत बोलायचं झालं तर हे प्लॅटफॉर्म सुरू होऊन आता जवळपास दोन दशकाचा काळ पूर्ण झाला आहे. हे प्लॅटफॉर्म 2005 मध्ये सुरू झाले. हे प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासूनच याची चर्चा आहे.
मनोरंजनासाठी सर्वात लोकप्रिय व्यासपीठ म्हणून यूट्यूब कडे पाहिले जाते. यावर व्हिडिओ स्वरूपात मोठ्या प्रमाणात कंटेंट उपलब्ध होतात. चित्रपट, गाणे, मालिका, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म याशिवाय शैक्षणिक व्हिडिओज, माहितीपर व्हिडिओज या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. छोट्या मुलांसाठी कार्टून व्हिडिओ देखील यावर उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे युट्युब वर बातम्या आणि शैक्षणिक कार्यक्रमाचा प्रसारही मोठ्या प्रमाणात होतो. युट्युब सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत अनेकदा यामध्ये बदलही करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे युट्युब मधून अनेकांना रोजगार मिळाला आहे. युट्यूब व्हिडिओ तयार करून अनेक जण लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
म्हणजेच यामध्येच अनेकांनी करिअर घडवले आहे. युट्युब व्हिडिओला मिळालेल्या व्ह्यूजवर यातून मिळणाऱ्या पैशांचे गणित अवलंबून असते. गूगल एडसेन्सच्या माध्यमातून ही कमाई केली जाते. दरम्यान आज आपण जगातील सर्वात लोकप्रिय टॉप 10 युट्युब चॅनेल ची माहिती पाहणार आहोत.
आज आपण ज्या यूट्यूब चैनलचे सर्वाधिक सबस्क्रायबर आहेत त्या टॉप 10 यूट्यूब चैनलची माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या क्रमांकाचे चैनल हे भारतीय आहे. दर्शकाच्या बाबतीत एक भारतीय चॅनल जगात एक नंबर वर आहे, जी की आपल्या साऱ्यांसाठी एक अभिमानाची बाब आहे.
जगातील सर्वात लोकप्रिय टॉप 10 यूट्यूब चैनल कोणते?
1) टी सिरीज – हिंदी भाषेतील या यूट्यूब चॅनलचे जवळपास 265 मिलियन subscriber आहेत.
2) मि. बिस्ट – या अमेरिकन चॅनलचे जवळपास 258 मिलियन सबस्क्राईबर आहेत.
3) कोकमेलॉन – या इंग्रजी भाषेच्या अमेरिकन चॅनलचे जवळपास 175 मिलियन सबस्क्राईबर आहेत.
4) सोनी एंट. टीव्ही. – या हिंदी भाषेतील भारतीय चॅनलचे जवळपास 172 मिलियन सबस्क्राईबर आहेत.
5) किड्स डायना शो – या इंग्रजी भाषेतील अमेरिकन चॅनलचे 122 मिलियन सबस्क्राईबर आहेत.
6) व्लाड आणि निकी – या रशियन चॅनलचे 117 मिलियन सबस्क्राईबर आहेत.
7) लाईक नास्त्या – या रशियन चॅनलचे 115 मिलियन सबस्क्राईबर आहेत.
8)प्युडाईपाई – स्वीडन देशातील या इंग्रजी चॅनलचे 111 मिल्लियन सबस्क्राईबर आहेत.
9) झी म्युझिक कंपनी – या हिंदी भाषेतील भारतीय चॅनलचे जवळपास १०७ मिलियन सबस्क्राईबर आहेत.
10) डब्ल्यूडब्ल्यूई – या अमेरिकन इंग्रजी चॅनलचे 101 मिलीयन सबस्क्राईबर आहेत.