Tur Farming : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. विशेष म्हणजे सोयाबीनचे बाजार भाव गेल्या अनेक महिन्यांपासून मंदीत आहेत. मात्र तुरीचे दर गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तेजीत आले आहेत.
गेल्या हंगामा तुरीचे कमी उत्पादन झाले असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दरात तेजी आली आहे. शिवाय सणासुदीचा काळ असल्याने तुरीच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून सध्या तुरीचे दर तेजीत आहेत.
सहाजिकच यामुळे तूर डाळ बाजारात चढ्या दराने विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. यामुळे महागाईच्या मुद्द्यावर विपक्ष कडून सरकारला घेरले जात आहे. शिवाय सर्वसामान्य जनता देखील महागाईमुळे परेशान आहे. यामुळे येत्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा सरकारला गोत्यात आणू शकते असे सांगितले जात आहे.
त्यामुळे सरकारकडून महागाई कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून तूरडाळ किंमत नियंत्रणात आणण्यासाठी आता सरकार मोठे निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तुरीचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिरावले असल्याने सरकार तुरीचे दर कमी करण्यासाठी धडपडत आहे.
सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी 31 मार्च 2024 पर्यंत तूर, उडीद आणि मसूर या डाळींच्या आयातीवरील शुल्क हटवले आहे. अर्थातच तूर, उडीद आणि मसूर आयात करण्यासाठी सध्या आयात शुल्क लागत नाहीये. मात्र हा निर्णय घेतल्यानंतरही तुरीचे दर तेजीतच आहेत.
यामुळे आता सरकार तुरीचा वापर कमी व्हावा आणि मटार तसेच काबुली हरभऱ्याचा वापर वाढावा यामुळे मटार आणि काबुली हरभऱ्यासाठी लागणारे आयात शुल्क देखील कमी करणार असल्याचे जाणकार लोकांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर निश्चितच तुरीच्या दरात घसरण होऊ शकते.
शिवाय आता आफ्रिकेत तुरीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की आफ्रिकेत तुरीचे उत्पादन घेतले जाते मात्र त्या देशात तूर खाल्ली जात नाही. ही तुर केवळ भारतात निर्यात करण्यासाठी आफ्रिकेत उत्पादित होते.
आता तेथील तुरीची काढणी पूर्ण झाली असल्याने या महिन्याच्या अखेरपर्यंत आफ्रिकेतून भारतात मोठ्या प्रमाणात तूर आयात होणार आहे. शिवाय पुढल्या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून आयातीचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे थोड्या प्रमाणात का होईना पण तुरीच्या दरावर थोडे दिवस दबाव राहणार आहे. मात्र जास्त काळ तुरीचा बाजार दबावात राहणार नाही.
कारण की या हंगामात देखील पाऊस कमी झाला असल्याने आणि लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असल्याने उत्पादन घटणार आहे. यामुळे तुरीच्या मागणीत आणि पुरवठ्यात तफावत राहील आणि याचा परिणाम म्हणून आगामी काळात देखील दरात तेजीच राहील असे जाणकार लोकांनी सांगितले आहे.