Turmeric Rate : हळद हे मराठवाड्यात, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. खरंतर हे एक नगदी पीक आहे. राज्यातील काही भागातील हवामान या पिकासाठी पोषक आहे. या पिकातून शेतकऱ्यांना अलीकडे शाश्वत उत्पन्न मिळत आहे. परिणामी हळद लागवडीखालील क्षेत्रात देखील वाढ झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे हळदीच्या बाजारभावाबाबत. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी हळदीला चांगला विक्रमी भाव मिळत होता. ऑगस्ट महिन्यात हळद तब्बल 17 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली होती.
मात्र या चालू सप्टेंबर महिन्यात हळदीच्या बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. हळदीचे बाजार भाव तब्बल 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. अर्थातच हळदीच्या बाजार भावात चार ते पाच हजाराची घसरण झाली आहे. यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आहे.
अचानक बाजार भावात घसरण झाली यामुळे हळद उत्पादकांमध्ये सध्या पॅनिक वातावरण आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग सुरू केले आहे. भविष्यात हळदीचे बाजार भाव आणखी कमी होतील अशी भीती शेतकऱ्यांना असल्याने आता हळदीची विक्री हळूहळू वाढत आहे. बाजारभावात घसरण होत असतांनाही बाजारपेठांमध्ये हळदीची विक्रमी आवक नमूद केली जात आहे.
मात्र हळद उत्पादकांना लवकरच दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे. हळदीच्या दरात आगामी काही दिवसांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांनी वर्तवली आहे. तसेच काही प्रयोगशील हळद उत्पादकांनी देखील येत्या काही दिवसांमध्ये हळदीच्या बाजारभावात वाढ होऊ शकते असे सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या मते गणेशोत्सवानंतर अर्थातच या चालू महिन्याच्या अखेरपर्यंत हळदीच्या बाजारभावात मोठी वाढ होऊ शकते. ऑगस्ट महिन्यात जेवढा भाव मिळाला होता त्यापेक्षाही अधिक भाव गणेशोत्सवानंतर हळदीला मिळेल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
निश्चितच जर हळदीला आगामी काही दिवसात चांगला विक्रमी भाव मिळाला तर उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यातील हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणतात. येथील बाजार हा हळदीच्या लिलावासाठी विशेष ओळखला जातो.
या बाजारात हळदीला जून महिन्यात सात ते आठ हजाराचा भाव मिळत होता. मात्र जुलै च्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारभावात चांगली वाढ झाली. जुलैच्या अखेरपर्यंत या बाजारात 12,000 प्रतिक्विंटल ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान हळदीला भाव मिळाला. त्यानंतर जवळपास एक महिना हळदीचे दर अशाच तेजीत राहिले.
ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात या मार्केटमध्ये हळदीला तब्बल 14 हजार रुपये प्रति क्विंटल ते 17 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला होता. मात्र या विक्रमी बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. 11 सप्टेंबर 2023 रोजी हिंगोली येथील या मार्केटमध्ये झालेल्या लिलावात हळदीला मात्र 11000 रुपये प्रति क्विंटल ते 12555 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे.