रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कारणामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात होणार मोठी कपात, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने स्वदेशी बनावटीची हाय स्पीड वंदे भारत ट्रेन सुरू केली. ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. या ट्रेनचा गतिमान आणि सुरक्षित प्रवास रेल्वे प्रवाशांना भावला आहे. हे जरी तितकेच खरे असले तरी देखील या ट्रेनच्या भाड्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिकचा पैसा मोजावा लागत असल्याने अनेक मार्गावरील वंदे भारत ट्रेन कडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. वंदे भारतच्या तिकीट दरावरून भारतीय रेल्वेची मोठी किरकिरी झाली आहे. ही ट्रेन केवळ उच्चभ्रू समाजातील लोकांसाठी बनवण्यात आली असल्याचा आरोप देखील अनेक प्रवाशांनी केला आहे.

अशातच आता वंदे भारत ट्रेनच्या तिकीट दराबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे की आता या गाडीच्या तिकीट दरात भारतीय रेल्वे कपात करणार आहे. परंतु देशातील सर्वच मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होणार नाही तर काही मोजक्याच मार्गांवरील गाड्यांच्या तिकीट दरात कपात केली जाणार आहे.

कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर कमी होणार

सध्याच्या घडीला देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पाच गाड्या धावत आहेत. नागपूर बिलासपूर, मुंबई गांधीनगर, मुंबई साईनगर शिर्डी, मुंबई सोलापूर आणि मुंबई गोवा या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन चालवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जास्तीच्या अंतरावरील मार्गावर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवाशांची चांगली गर्दी होत आहे.

यात कासारगोड-तिरुवअनंतपुरम या जास्तीचे अंतर असलेल्या मार्गावर १८३ टक्के बुकिंग होत आहे. मात्र, कमी अंतरावरील अनेक गाड्यामध्ये ५० टक्के बुकिंग देखील होत नाहीये. यामध्ये इंदूर ते भोपाळ या मार्गावर सुरू असलेल्या या हाय स्पीड ट्रेनमध्ये केवळ 21 टक्के बुकिंग होत आहे. नागपूर-बिलासपुर या मार्गावर सुरू असलेल्या या हाय स्पीड ट्रेनबाबत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

सध्या देशातील कमी अंतरावरील वंदे भारत ट्रेन मध्ये एसी चेअर कारचं सरासरी भाडं ९५० रुपये एवढे आहे. तर, एक्झिक्युटिव्ह चेअर कारचं भाडं १.५२५ रुपये आहे. अशा परिस्थितीत आता कमी अंतरावरील मार्गावर सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी कमी अंतरावर सुरु असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवाशांनी अधिकाअधिक प्रवास करावा आणि या मार्गावरील गाड्यांमध्ये सीट रिकामे राहू नये यासाठी तिकीट दरात कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. निश्चितच भारतीय रेल्वेने जर हा निर्णय घेतला तर प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

Leave a Comment