मोठी बातमी ! मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ स्थानकावर पण थांबणार, वाचा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या मार्गावर फेब्रुवारी 2023 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. दरम्यान, याच दोन्ही गाडी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. या दोन्ही गाड्यांना आता रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून नवीन थांबे देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेने याबाबतचा निर्णय घेतला असून याची माहिती काल अर्थातच बुधवारी 2 ऑगस्ट 2023 रोजी मध्य रेल्वेच्या माध्यमातून एका पत्रकाच्या द्वारे देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला आणि मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळाला थांबा?

हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला ठाणे या रेल्वे स्थानकावर आता थांबा दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून घेण्यात आला असून या निर्णयामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करु इच्छितो की, सध्या या गाडीला दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी येथे थांबा आहे आता ठाणे हा नवीन थांबा राहणार आहे. यासोबतच, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला कल्याण या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय मध्ये रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. सध्या या गाडीला दादर, ठाणे, नाशिक रोड या ठिकाणी थांबा आहे.

आता कल्याण हा नवीन थांबा राहणार आहे. मध्य रेल्वेने याबाबत काल अर्थातच दोन ऑगस्ट रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सदर निर्णय हा 4 ऑगस्ट 2023 पासून लागू राहणार आहे. अर्थातच उद्यापासून या नवीन थांब्यावर या गाड्या थांबणार आहेत.

Leave a Comment