केशरी रंगाची वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे कारण काय ? रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशात मोठमोठ्या महामार्गाची कामे केली जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. निओ मेट्रो सारखा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

याशिवाय देशातील विविध शहरांना लोहमार्गाने म्हणजे रेल्वे मार्गाने जोडले जात आहे. विविध महत्त्वाच्या शहरांदरम्यान जलद गतीने प्रवास व्हावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सूरु केल्या जात आहेत. वास्तविक वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिलीच हाय स्पीड ट्रेन आहे.

ही ट्रेन 2019 मध्ये पहिल्यांदा सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

सुरुवातीला ही गाडी सुरू झाली तेव्हा पांढऱ्या आणि निळ्या रंगात सुरू करण्यात आली होती. परंतु अचानक या गाडीचा कलर बदलण्यात आला आणि ही गाडी केशरी रंगात बनवण्यात आली आहे.

यामुळे आपल्या हिंदुत्ववादी एजेंडा जोपासण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने या गाडीचा कलर बदलला असल्याच्या चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र वंदे भारत एक्सप्रेसचा रंग केशरी का निवडण्यात आला, यामागील खरं कारण काय याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचा कलर केशरी का?

खरंतर, केशरी म्हणजे भगवा रंग हा हिंदुत्वाचे प्रतीक आहे. भगवा रंग सनातन हिंदू धर्मात मानाचा समजला जातो. हिंदू धर्माचा ध्वज देखील भगव्या रंगाचाच आहे. यामुळे जेव्हा वंदे भारत ट्रेनचा रंग भगवा करण्यात आला त्यावेळी भाजपा सरकारने हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे ट्रेनचा कलर बदलला असल्याच्या चर्चा देखील रंगल्यात.

मात्र आता याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. वंदे भारत एक्सप्रेसचा रंग भगवा करण्यामागे कोणताच राजकीय हेतू दडलेला नसून यामागे एक शास्त्रीय कारण आहे. ते म्हणतात की मानवी डोळ्यांना केशरी आणि पिवळा हे दोन रंग लवकरात लवकर दिसतात.

हे दोन्ही रंग मानवी डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. यामुळे डोळ्यांना कुठलाच त्रास होत नाही. हेच कारण आहे की, युरोपातील जवळपास 80 टक्के रेल्वे गाड्यांना पिवळा आणि केशरी रंग दिलेला आहे. विशेष म्हणजे विमानातील ब्लॅक बॉक्स देखील केशरी रंगाचा असतो. यामुळे देशातील हाय स्पीड ट्रेनचा म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसचा रंग देखील केशरी अर्थातच भगवा करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात ?

देशातील एकूण 34 मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मार्गाचा समावेश होतो. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपुर या पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. विशेष बाब अशी की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर यादरम्यान देखील लवकरच ही गाडी सुरू केली जाणार आहे.

Leave a Comment