पंजाबरावांचा हवामान अंदाज : ‘या’ एका कारणामुळे नोव्हेंबर महिन्यात जोरदार पाऊस बरसणार, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होणार? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj November 2023 : पंजाबरावांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. खरंतर हवामान खात्याने निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील जवळपास 45 ते 50 टक्के भागातून मान्सून माघारी फिरला आहे.

विशेष म्हणजे आगामी काही दिवसांमध्ये उर्वरित महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत पाऊस पडणार नाही.

यावर्षी विजयादशमी अर्थातच दसरा 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. यानंतर 25 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सव संपेल. विजयादशमीचा सण साजरा झाल्यानंतर नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे.

खरंतर दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात पाऊस पडतो. सर्वदूर पडत नाही मात्र अनेक भागात नवरात्र उत्सवात पावसाची हजेरी लागते. यंदा देखील नवरात्र उत्सवात पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. परंतु पंजाबराव डख यांनी यंदा नवरात्र उत्सवात पाऊस पडणार नाही असे सांगितले आहे.

पण नवरात्र उत्सव संपल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. डख म्हणताय की, यावर्षी जून महिन्यात पाऊस झाला नाही पण जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही पण सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस आला.

तसेच आता ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडणार नाही परंतु नोव्हेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडू शकतो. पावसाची सुरुवात मात्र 25 ऑक्टोबर पासूनच होणार आहे. विजयादशमीच्या दिवसापासून राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि पाच नोव्हेंबर पर्यंत राज्यात पाऊस पडेल असा नवीन हवामान अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

यंदा नोव्हेंबरमध्ये चांगला पाऊस होणार असून दिवाळीच्या कालावधीत राज्यात यावर्षी पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. 

Leave a Comment