Vande Bharat Express Ticket Rate : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वे देखील आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न करते. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली.
सध्या देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवली जात आहे. विशेष म्हणजे यापैकी पाच गाड्या महाराष्ट्रातून चालवल्या जात आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साई नगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपुर या महत्त्वाच्या मार्गावर हे गाडी सुरू आहे.
विशेष बाब अशी की येत्या काही महिन्यात पुणे ते सिकंदराबाद नागपूर ते सिकंदराबाद आणि मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही महिन्यात भारतीय रेल्वेकडून देशातील 10 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे.
मात्र या गाडीची लोकप्रियता वाढत असली तरी देखील ही गाडी फक्त श्रीमंतांसाठी सुरू झाली आहे अशी टीका देखील केली जात आहे. या गाडीचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस गाडीच्या तुलनेत महाग असल्याने या गाडीचा सर्वसामान्यांना फायदा होत नसल्याचे सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने सर्वसामान्य लोकांना देखील या गाडीने प्रवास करता यावा यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे आता नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस चालवणार आहे. या नॉन एसी वंदे भारतचे तिकीट दर हे सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी राहणार आहेत.
केव्हा सुरु होणार
मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर नॉन एसी वंदे भारत ट्रेन ऑक्टोबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी सूरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे या चालू आर्थिक वर्षात या प्रकारच्या दोन गाड्यां सुरू केल्या जाणार आहेत. या ट्रेनच्या बांधणीचे काम सध्या आयसीएफ चेन्नईच्या कोच फॅक्टरी मध्ये सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस सध्याच्या एसी वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा थोडी वेगळी राहणार आहे. या गाडीची बाह्य रचना वेगळी राहणार असून या गाडीचा कमाल वेग देखील कमी राहणार आहे. Ac गाडीचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. पण नॉन एसी गाडीचा वेग 130 किलोमीटर प्रति तास एवढा राहील असे सांगितले जात आहे.
मात्र एसी गाडीमध्ये ज्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत तशाच स्वरूपाच्या सोयीसुविधा या नॉन एसी गाडीमध्ये राहणार आहेत. Non Ac गाडीत फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. AC गाडीमध्ये जसे टॉयलेट आहे तसेच टॉयलेट नॉन एसी मध्ये बसवले जाणार आहे.
एवढेच नाही तर non एसी मध्ये दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर राहणार असून एलएचबी कोच देखील राहतील अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच नॉन एसीचे तिकीट दर जवळपास एसी गाडी पेक्षा निम्म्याने कमी राहणार असल्याचा दावा देखील केला जात आहे.