Vande Bharat Metro Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभतपूर्व यशानंतर आता भारतात वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. ही ट्रेन पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
सध्या स्थितीला ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील एकूण आठ महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, CSMT ते सोलापूर, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते अहमदाबाद या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.
याशिवाय पुणे ते शेगाव, मुंबई ते शेगाव, पुणे ते बडोदा, मुंबई ते छत्रपती संभाजी नगर, पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. अशातच देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात आता लवकरच वंदे भारत मेट्रो रुळावर धावणार आहे. ही ट्रेन 100 ते 200 किलोमीटर अंतरावर वसलेल्या दोन शहरांना जोडण्याचे काम करणार आहे. या गाडीची जुलै महिन्यात ट्रायल होणार आहे.
ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ही गाडी देशातील विविध मार्गांवर चालवली जाणार आहे. राजधानी मुंबईला देखील वंदे मेट्रोची भेट मिळणार असा दावा केला जात आहे. ही गाडी मुंबई ते ठाणे दरम्यान चालवली जाऊ शकते अशी माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमधून समोर आली होती.
सुरुवातीला या ट्रेनचे 50 डब्बे तयार होणार आहेत. मात्र भविष्यात देशभरात 400 वंदे भारत मेट्रो चालवण्याचे नियोजन सरकारचे आहे. निश्चितच यामुळे देशभरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दिल्ली ते आग्रा दरम्यान सुरू होणार वंदे मेट्रो
ही वंदे भारत मेट्रो ट्रेन दिल्ली ते आग्रा दरम्यान देखील चालवली जाणार असा दावा होत आहे. या ट्रेनमुळे 200 किलोमीटरचा प्रवास अवघ्या दीड तासात पूर्ण करता येईल असे म्हटले जात आहे. कारण की ही गाडी 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम राहणार आहे.
या गाडीमुळे दिल्ली ते आग्रा दरम्यान दैनंदिन कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या ट्रेनमध्ये 12 कोच राहणार आहे. मात्र असे असले तरी आवश्यकतेनुसार डब्यांची संख्या 16 पर्यंत वाढवता येणे शक्य राहणार आहे. ही गाडी देशातील 124 प्रमुख शहरांना जोडणार आहे.