Vande Bharat Train : सध्या देशातील एकूण 34 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची स्वदेशी हायस्पीड ट्रेन सुरू आहे. खरंतर 24 सप्टेंबर पर्यंत राज्यात 25 मार्गांवर ही गाडी धावत होती. मात्र 24 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 25 वरून 34 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आपल्या महाराष्ट्राला देखील येत्या काही महिन्यात आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात पाच वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपूर या पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
तसेच मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल दरम्यान ही गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. विशेष म्हणजे या मागणीवर रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. अर्थातच या मार्गावर आगामी काही महिन्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते.
याशिवाय पुणे ते सिकंदराबाद, नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर देखील ही गाडी सुरू करण्याचे नियोजन आहे. अशातच वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि सुरक्षित झाला आहे. यामुळे या गाडीला प्रवाशांच्या माध्यमातून चांगली पसंती देखील मिळत आहे.
परंतु या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या गाडीत मिळणाऱ्या जेवणाबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. अशा परिस्थितीत या गाडीच्या जेवणात आता महत्त्वाचा असा बदल करण्यात आला आहे. याबाबत भारतीय रेल्वे प्रशासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार आता पुढील सहा महिने वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेज फूड दिले जाणार नाही. प्रवाशांचे आरोग्य, स्वच्छता आणि ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वेने आपल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, बेकरी प्रोडक्ट्स, वेफर्स, मिठाई, कोल्ड्रिंक्स इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. ट्रेनच्या आत फेरीवाल्यांमुळे होणारी समस्या, द्रेनमधील खाद्यपदार्थांचा जास्त साठा आणि दरवाजे वारंवार उघडणे यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेट फूड वस्तूंच्या विक्रीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती या परिपत्रकातून समोर आली आहे.
तसेच आता प्रवाशांना खानपान सेवांबाबत प्री-बुकिंग करावे लागणार असल्याचे सांगितले गेले आहे. या गाडीने प्रवास करणाऱ्यांना आता प्रवासापूर्वी २४ ते ४८ तास आधी पुन्हा एक एसएमएस पाठवला जाईल. तसेच जे लोक प्रीपेड जेवण निवडणार नाहीत आणि त्यांनी ट्रेनमध्ये ऑर्डर दिली तर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले जाईल. अशा प्रवाशांना जेवण उपलब्ध असल्यास जेवण मिळेल पण ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.