मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हे’ दोन महत्त्वाचे मार्ग ‘या’ वाहनांसाठी राहणार बंद, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Pune Travel : 19 सप्टेंबरपासून सुरू झालेला गणेशोत्सवाचा पर्व संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी शहरात वसलेले चाकरमाने गावाकडे परतले आहेत. यामुळे गावा-गावांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गणरायाच्या आगमनाने दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र दुष्काळा बाहेर पडला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यात सर्व दूर चांगला पाऊस होत आहे. यामुळे विघ्नहर्ता बाप्पाने बळीराजाची विघ्न हरलीत असे म्हणायला हरकत नाही. दरम्यान काही भागात अजूनही दुष्काळी परिस्थिती आहे पण बळीराजाचे हे दुःख लाडक्या गणरायाच्या आगमनाने निर्माण झालेल्या नव्या चैतन्यामुळे दूर झाले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात गणेश भक्तांच्या माध्यमातून मोठ्या आनंदात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे. गणरायाचे येत्या दोन दिवसात विसर्जन केले जाणार आहे. 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे आणि याच दिवशी गणेश विसर्जन राहणार आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. वास्तविक गणेश विसर्जनासाठी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात. हजारो गणेश भक्त मिरवणुकीत सामील होतात आणि लाडक्या बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर या अस म्हणून निरोप देतात.

यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरांमधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शहराच्या वाहतुकीसोबतच शहराबाहेरील वाहतुकीत देखील प्रशासनाच्या माध्यमातून बदल केला जात आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीत थोडासा बदल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर 27 सप्टेंबर मध्यरात्री 12 ते 29 सप्टेंबर रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण एकाच दिवशी येत असल्याने प्रशासनाच्या माध्यमातून वाहतुकीबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर देखील गणेश विसर्जनाच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावर 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांना 28 सप्टेंबर सकाळी आठ वाजेपासून ते 29 सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत बंदी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबतचे सविस्तर परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आले आहे. तसेच पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील एन एच ४८ म्हणजे जुना मुंबई – पुणे महामार्गावरून मुंबई शहर, नवी मुंबई तसेच ठाण्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Leave a Comment