Weather Update : महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमना बरोबरच वरूणराजाचे देखील आगमन झाले आहे. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यभर जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी जास्तीच्या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही जोरदार पावसाची गरज आहे.
खरंतर राज्यात गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात पावसाचा जोर कमी होता पण 22 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढला. राज्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण समवेतच संपूर्ण राज्यभर पावसाची हजेरी लागली. पण काही भागात अजूनही दुष्काळाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत.
यामुळे तेथील शेतकरी आणि सर्वसामान्य जनता संकटात आली आहे. आगामी काळात जर चांगला पाऊस झाला नाही तर तेथे भीषण दुष्काळ पडणार असे सांगितले जात आहे. राज्यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. कोकणात देखील चांगल्या पावसाची हजेरी लागली आहे.
अशातच हवामान खात्याने आणखी काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर पुढील 24 तास राज्यासाठी खूपच महत्त्वाचे राहणार आहेत. कारण की येत्या 24 तासात राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. यामुळे गणरायाच्या आगमना बरोबर दाखल झालेला पाऊस आता गणपती बाप्पाला निरोप देताना देखील मनसोक्त बरसणार असल्याचे चित्र तयार होत आहे.
कुठे पडणार जोरदार पाऊस?
भारतीय हवामान विभाग अर्थातच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे परंतु मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
यामुळे आज मराठवाड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथील शेतकऱ्यांना यानिमित्ताने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर सह संपूर्ण मराठवाड्यात चांगला पाऊस पडू शकतो असे सांगितले जात आहे. यामुळे आता हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो का आणि दुष्काळाच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्याला दिलासा मिळतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.