Weather Update Monsoon :- बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता सध्या कमी झाली असून या चक्रीवादळाचे रूपांतर आता कमी दाब क्षेत्रामध्ये झाले आहे. त्यामुळे आता गुजरात मधील सौराष्ट्र, कच्छ इत्यादी भागामध्ये पाऊस पडत आहे. या भागातील जनजीवन अद्याप देखील विस्कळीत आहे.

जर आपण मान्सूनच्या वाटचालीचा आजचा विचार केला तर ती आज देखील थबकलेलीच होती. मान्सूनची वाटचाल कधीपर्यंत सुरू होईल? या चक्रीवादळाची सद्यस्थिती काय आहे? याची माहिती आपण या लेखात घेऊ.

Advertisement

महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती?

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून आठवडाभराच्या उशीराने केरळात दाखल झाला आहे. त्याचा परिणाम मान्सूनच्या पुढील प्रवासावरही होताना दिसत
आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीनुसार २२ जूनपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता आणखी एक आठवडा पावसाची वाट पाहावी लागू शकते.

Advertisement

दरम्यान राज्यात २३ जूनपासून मान्सून पाऊस येणार असल्याचे पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी गुरुवारी वर्तवण्यात आलेल्या पूर्वानुमानाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले आहे. मान्सून २३ जूनपर्यंत येईल असं सांगण्यात आलं आहे.

तसेच २३ जूनपासून सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे आणि १६ ते २२ जून या कालावधीत कोकण विभागामध्ये २.५ ते १० मिलीमीटर पाऊस प्रती दिन पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

चक्रीवादळाची तीव्रता कमी
चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल थांबलेलीच आहे. मान्सून जवळजवळ मंगळवारपासून एकाच भागात रखडलेला असून मान्सून सध्या कोकण, केरळ आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये आजही मान्सूनने हवी तेवढी प्रगती केलेली नाही. सध्या मान्सूनचे सीमा रत्नागिरी, श्रीहरीकोटा, मालदा आणि पोरबंदर या भागात होती. परंतु 22 जूनच्या दरम्यान मान्सून दक्षिण दीपकल्पाचा आणखी काही भाग, पूर्व भारत आणि शेजारच्या काही भागात प्रगती करू शकतो असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

दुसरीकडे पाहिले तर बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता सौराष्ट्र आणि कच्छ या भागांमध्ये कमी झाली असून aआग्नेय पाकिस्तान आणि शेजारच्या आग्नेय पाकिस्तान आणि शेजारच्या काही भागात या चक्रीवादळाचे रूपांतर हवेच्या कमी दाब क्षेत्रात झाले आहे. हे चक्रीवादळ आता ईशान्य कडे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने वाटचाल करीत असून सध्या हे चक्रीवादळ नैऋत्य राजस्थानमध्ये, गुजरात आणि नैऋत्य पाकिस्तान च्या जवळ आहे.

Advertisement

या चक्रीवादळामुळे राजस्थानतील बारमेर पासून ऐंशी किलोमीटर आणि जोधपुर पासून 210 किलोमीटर अंतरावर असून हे चक्रीवादळ पूर्व ईशान्य भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाची तीव्रता येणाऱ्या सात तासात आणखी कमी होण्याची शक्यता असून त्यानंतर पुढील काही तास हे कमी दाब क्षेत्र कायम राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे या भागात पुढील बारा तास 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून त्यानंतर याचा वेग कमी होणार आहे.

दक्षिण राजस्थान आणि गुजरात मधील कच्छ भागात पावसाचा अंदाज असून दक्षिण राजस्थान या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर कच्छ या ठिकाणी काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाआहे.तसेच पश्चिम बंगाल,सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड मणिपूर त्रिपुरा, सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोवा या भागात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *