7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेगवेगळे लाभ पुरवले जात असतात. महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता असे नाना प्रकारचे लाभ सरकारकडून मिळतात. दरम्यान महागाई भत्ता बाबत बोलायचं झालं तर हा भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो.

जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून दरवर्षी महागाई भत्ता सुधारित केला जात असतो. जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. आता यामध्ये जानेवारी 2024 पासून सुधारणा होणे अपेक्षित आहे.

Advertisement

दरम्यान जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता वाढ मिळणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच मात्र लेबर ब्युरो कडून एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे. खरंतर महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते.

म्हणजेच आता जुलै 2023 ते डिसेंबर 2023 यादरम्यानच्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे.

Advertisement

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. एआयसीपीआयच्या डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.

आधी 5 टक्के वाढ होईल असे बोलले जात होते मात्र एआयसीपीआयची डिसेंबरची आकडेवारी समोर आल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Advertisement

विशेष बाब म्हणजे याआधी देखील तीन वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 3% ने वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आता सलग चौथ्यांदा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे सदर नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.

निर्णय केव्हा होणार ? 

Advertisement

जानेवारी महिन्यापासून 4 टक्के महागाई भत्ता वाढ लागू होईल हे जवळपास नक्की झाले आहे. परंतु याचा निर्णय केव्हा होणार हा मोठा सवाल आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, होळीच्या सणानिमित्त अर्थातच मार्च 2024 मध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार दरवर्षी मार्च महिन्यातच जानेवारीपासूनच्या महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय घेत असते. यावर्षी देखील मार्च महिन्यातच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Advertisement

जर मार्च महिन्यात निर्णय झाला तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *