Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर, या हंगामात कापूस अतिशय कवडीमोल दरात विकला गेला आहे. कापसाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेल्या दरात कापूस विकला तर त्यांना उत्पादन खर्च देखील भरून काढता येणार नाही.
अशा परिस्थितीत, शेतकरी आक्रमक बनले आहेत. कापसाला किमान 12 हजाराचा भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यासाठी आंदोलनाचा बडगा उगारला आहे. कापूस पंढरी म्हणून संपूर्ण राज्यात ख्याती प्राप्त असलेल्या जळगाव मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने कापसाला 12 हजाराचा भाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरू होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे शेतकरी आंदोलन करण्यात आले. यात रवींद्र पाटील उपोषणाला बसले होते. गेल्या तीन दिवसांपासून पाटील उपोषणाला बसले असल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत चर्चा केली.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन कापसाला अनुदान देण्यावर निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपोषणाला बसलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची प्रत्येक्ष भेट घेतली.
यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा केली. यावेळी पुढील काळात कापसाला अनुदान देण्यासंदर्भात बैठक लाऊन, त्यासाठी अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेऊ असे आश्वासन रवींद्र पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर दिले असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या आश्वासनानंतर रविंद्र पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.
निश्चितच, जर शिंदे फडणवीस सरकारने कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कापसाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला तर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संकटाच्या काळात आर्थिक हातभार लागणार आहे. दरम्यान, कापसाला किती अनुदान मिळणार? केव्हा मिळणार या संदर्भात अद्याप कोणतीच माहिती हाती आलेली नाही.