नगरकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ राज्यातील सर्वात मोठा पूल वाहतूकीसाठी सुरु, ‘त्या’ 25 गावातील नागरिकांचा प्रवास होणार सुपरफास्ट 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आजपासून देशात दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रसन्न वातावरणात अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी खुशखबर समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 17 वर्षांपासून म्हणजेच दीड दशकांपेक्षा अधिक काळ रखडलेला एक महत्त्वाचा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील धरण जलाशयावरील राज्यातील सर्वाधिक लांबीचा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे. राजूर ते पिंपरकने येथील पुलाचे काल लोकार्पण झाले आहे.

या पुलाला आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे जलसेतू म्हणून ओळखले जात आहे. हा पुल काल अर्थातच आठ नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे.

किरण लहामटे यांनी या पुलाचे लोकार्पण केले असून या पुलामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाची एकूण लांबी 560 m एवढी आहे. पण यामुळे 60 किलोमीटरचा वळसा वाचणार आहे.

खरंतर हा पूल 2007 मध्ये मंजूर झाला होता. पण पूल मंजूर झाल्यानंतर या पुलाचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. यामुळे निळवंडे धरणामुळे संपर्क तुटलेल्या पिंपरकणे परिसरातील 25 गावांमधील नागरिकांचा प्रवास आव्हानात्मक बनला होता.

खरतर पिंपरकणे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची राजूर ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. पण या परिसरातील लोकांना राजूरला प्रवास करायचा असेल तर आत्तापर्यंत वळसा घालून जावे लागत असे.

यामुळे हा पिंपरकणे पूल लवकरात लवकर तयार करून सर्वसामान्यांसाठी खुला झाला पाहिजे अशी मागणी केली जात होती. दरम्यान सतरा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पिंपरकणे येथील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू काल सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.

हा पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याने निळवंडे धरणामुळे संपर्क तुटलेल्या पिंपरकणे परिसरातील सतरा गावांमधील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

या पुलाच्या लोकार्पणानंतर परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे. उशिरा का होईना पण हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला असल्याने परिसरातील नागरिकांनी शासनाचे आभार मानले आहेत. 

Leave a Comment