ATM Card News : अलीकडे देशात बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने देखील नागरिकांना बँक खाते सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यासाठी शासनाकडून काही योजना देखील राबविण्यात आल्या आहेत. जनधन योजना ही अशीच एक कल्याणकारी योजना आहे.
या योजनेमुळे देशातील बँक खातेधारकांची संख्या आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, शेतमजूर सर्वांचेच आता बँकेत खाते आहे आणि बँकेचे एटीएम कार्ड आहे. खरंतर एटीएम कार्डमुळे आता पैशांचे व्यवहार खूपच सुलभतेने आणि जलद गतीने होऊ लागले आहेत.
नागरिकांना एटीएम कार्डमुळे खिशात पैसे बाळगण्याची गरज भासत नाही. एटीएम कार्डचा वापर करून देशभरातील कोणत्याही एटीएम मधून सहजतेने पैसे काढता येतात. मात्र काही वेळेस एटीएम कार्ड धारक लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक लोकांचे पैसे काढताना एटीएम कार्ड मशीन मध्येच अटकते.
अशावेळी एटीएम कार्ड धारकाला काहीच सुचत नाही. एटीएम कार्ड मशीन मध्ये अटकते यामुळे संबंधित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते. मात्र आता आपण एटीएम कार्ड जर मशीन मध्ये अडकले तर ते एटीएम कार्ड परत मिळवायचे कसे याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर कधी तुमचे एटीएम कार्ड मशीन मध्ये अडकले तर सर्वप्रथम तर तुम्हाला याची बँकेला माहिती द्यावी लागणार आहे. मग कस्टमर केअरला कॉल करा आणि एटीएमचे ठिकाण आणि अडकण्याचे कारण त्यांना सांगा. तुम्ही कस्टमर केअरशी बोलाल तेव्हा त्यांच्याकडून तुम्हाला दोन पर्याय दिले जातील.
तुम्हाला कस्टमर केअर कार्ड रद्द करण्याचा किंवा कार्ड पुन्हा काढण्याचा पर्याय देईल. जर तुम्हाला तुमच्या कार्डचा गैरवापर होऊ शकतो असे वाटतं असेल तर तुम्ही ते कार्ड तुम्ही रद्द करू शकता. तुम्ही कार्ड रद्द करण्याचे त्यांना कळवले की बँक तुम्हाला 7 ते 10 दिवसात तुमच्या पत्त्यावर नवीन कार्ड पाठवेल.
जर तुम्हाला लवकरात लवकर कार्ड हवे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊ शकता आणि त्यांच्याकडून तुमचे नवीन कार्ड प्राप्त करू शकता. जर तुम्हाला एटीएममध्ये अडकलेले कार्डच परत हवे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला त्याची माहिती देऊ शकता.
जर एटीएम मशीन तुमच्याच बँकेचे असेल तर कार्ड परत मिळणे आणखी सोपे होते. पण, जर दुसऱ्या बँकेचे एटीएम मशीन असेल, तर ती बँक ते कार्ड तुमच्या बँकेला परत करते मग त्यानंतर तुम्ही ते कार्ड तुमच्या बँकेतून मिळवू शकता. दरम्यान एटीएम लिंक अयशस्वी झाल्यामुळे म्हणजे कार्ड टाकल्यानंतर पिन, रक्कम किंवा खाते फीड करण्यात उशीर केल्यास एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकू शकते.
तसेच एटीएम मशीनचा वीजपुरवठा जर बंद झाला तर कार्ड देखील अडकते. यामुळे एटीएम मशीन मधून पैसे काढताना तुम्हाला निश्चितच या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तथापि जर एटीएम मशीन मध्ये तुमचे कार्ड अडकले असेल तर चिंता करण्याचे काही कारण नाही तुम्ही आम्ही सांगितलेली प्रोसेस फॉलो करून तुमचे एटीएम कार्ड परत मिळवू शकणार आहात.