सरकार देशातील ‘या’ मोठ्या सरकारी बँकेमधील आपला 61% हिस्सा विकणार ! ग्राहकांवर काय परिणाम होणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक धडाडीचे निर्णय घेत आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

सर्वसामान्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी जनधन योजना राबवणे, नोटाबंदी करणे, कॅशलेस इकॉनोमीला चालना देणे, आधार कार्ड बँकेसोबत जोडणे इत्यादीबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.

अशातच आता मोदी सरकार एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेणार असे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकार आयडीबीआय ही सरकारी बँक विकणार आहे.

या बँकेतील सरकारी हिस्सा सरकार विकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सरकारने मालमत्ता मूल्यधारकांकडून बँकेतील हिस्सेदारी खरेदी करण्याबाबत नवीन विनंती प्रस्ताव मागवले आहेत.

यासाठी 5 जानेवारी 2024 पर्यंत बीड अर्थातच बोली सादर करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आयडीबीआय बँकेत LIC ने सुद्धा गुंतवणूक केली आहे.

एलआयसी ने आयडीबीआय बँकेतील 51% हिस्सा खरेदी केला आहे. मात्र आता शासन एलआयसी सोबत या बँकेतील 61 टक्के हिस्सा विकणार असे वृत्त समोर आले आहे.

खरे तर या बँकेतील आपला हिस्सा विक्री करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोरोना काळापासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजून या बँकेतील हिस्सा विकला गेलेला नाही. पण आता ही प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे.

त्यामुळे मात्र आयडीबीआय बँकेतील ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही ग्राहकांना सरकार या बँकेतील हिस्सा विकणार म्हणजे ही बँक बंद होणार अशी चिंता भेडसावंत आहे. दरम्यान याबाबत तज्ञ लोकांनी मोठी माहिती दिली आहे.

तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सरकार एलआयसी सोबत आयडीबीआय बँकेतील 61 टक्के हिस्सेदारी विकत आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही.

आयडीबीआय बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचारी आणि ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील आणि त्याचप्रमाणे ग्राहकांना देखील सर्व सुविधा आधी सारख्याच मिळत राहतील अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.

Leave a Comment