शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढरे सोने पुन्हा चमकल, कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ, मिळाला एवढा भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price : दिवाळीपूर्वी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस कवडीमोल दरात विकले जात होते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कापूस बाजारातील मंदीचा मोठा फटका बसला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी तसेच रब्बी हंगामासाठी पैशांची निकड होती.

परिणामी दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी बाजार भाव कमी असतानाही मालाची विक्री केली आहे. परंतु आता बाजारात तेजीचे संकेत मिळू लागले आहेत. आता बाजारात नवीन हंगामातील कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून नवीन मालाला चांगला दरही मिळू लागला आहे.

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कापूस बाजारभावात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे.

दिवाळीपूर्वी सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकला जाणारा कापूस आता साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री होत आहे. यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान बघायला मिळत आहे.

दिवाळीपूर्वी हमीभावाच्या आसपास कापसाची विक्री केली जात होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता. पण आता परिस्थिती थोडीशी बदलली आहे. बाजारभावात किंचित सुधारणा झाली आहे. याचा परिणाम म्हणून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे.

सध्याच्या दरात किमान पिकासाठी आलेला खर्च भरून निघेल आणि पदरी चार पैसे शिल्लक राहतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच बाजार भावात आता सातत्याने वाढीचा ट्रेंड तयार झाला असल्याने भविष्यात आणखी तर वाढ होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली आहे.

एकंदरीत बाजारात आलेली ही तेजी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करीत आहे. दरम्यान काल अर्थातच 18 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील बहुतांशी बाजारात कापसाने 7300 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर राज्यातील एका बाजारात कापसाला 7500 चा दर मिळाला आहे.

कुठं मिळाला विक्रमी भाव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, काल हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च दर मिळाला आहे. काल या मार्केटमध्ये 3500 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली.

या कापसाला काल मार्केटमध्ये किमान 7000, कमाल 7501 आणि सरासरी 7200 एवढा विक्रमी भावना मत करण्यात आला आहे. तथापि कापसाला सरासरी 8000 चा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. 

Leave a Comment